jaykumar gore convoy car accident .jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

Akshay Sabale

साताऱ्यातील माण-खटाव येथे मोठा अपघात झाला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारनं दुचाकीला धडक दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील दोन्ही गाड्या चक्काचूर झाल्या आहेत.

माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) यांच्या ताफ्यातील कारचा शनिवारी सकाळी अपघात झाला. ही घटना दहिवडी जवळील बिदाल शेरेवाडी भागात घडली आहे. गोरे यांच्या ताफ्यातील कारनं दुचाकीला जोरदार धडका दिली. यात कार आणि दुचाकी चक्काचूर झाल्या आहेत.

हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील एका जागीच मृत्यू झाला होता. तर, गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अपघाबाबत पुढील चौकशी करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT