Jaykumar Gore : अडचणी वाढणार? न्यायालयाचा आदेश अन् पोलिसांनी जयकुमार गोरेंविरोधात उचललं मोठं पाऊल

Jaykumar Gore Mumbai High Court : आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस आमदार गोरेंविरोधात 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये आले आहेत.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Police Case Register Against Jaykumar Gore : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात मृत लोकांना जिवंत दाखवून निधी घोटाळा केल्याप्रकरणी गोरे यांच्याविरोधात सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील अधिकाऱ्यानं इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर या संस्थेतील सर्व जबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात वडूज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मायणी-खटाव येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर' रूग्णालय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी ताब्यात घेतलं होतं. 27 मे 2020 पासून येथे कोरोना उपचार केंद्र चालविण्यात येत होते.

Jaykumar Gore
Congress News : महायुती सरकारला जनता कंटाळली; काँग्रेसच्या नेत्याने केली टीका

संबंधित रूग्णालय आधीपासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न होते. संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ), त्यांची पत्नी सोनिया गोरे आणि अन्य आरोपींनी मृत कोरोना रूग्णांवर उपचार तसेच कर्तव्यावर नसलेल्या डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागपत्रांद्वारे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून गैरव्यवहार केल्याचं म्हणत सातारा जिल्ह्यातील मायणी ( ता. खटाव ) येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्याची दखल घेत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठानं याप्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये आलेल्या सातारा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगरला आहे.

Jaykumar Gore
Jaykumar Gore on Mohite Patil : खासदारसाहेब, लुंग्या-सुंग्यांच्या नादी लागून प्रसिद्धीचा स्टंट करू नका; गोरेंचा मोहिते पाटलांना टोला

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी देविदास बागल यांनी या संस्थेतील पदाधिकाऱ्यांविरोधात वडूज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

दरम्यान, हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे दीपक देशमुख यांच्याविरोधात देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com