Satara News: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दम होता तर स्वतंत्र लढायचे होते. आमच्या मतांवर निवडून आलेल्या संचालकांनी चेअरमन निवडला आहे. दम होता तर जिल्हा परिषदेप्रमाणे स्वतंत्र लढायचे होते. मग जखम भरून निघाल्याचा अधिकार होता. मात्र, जखम भरून निघण्यासाठी अघोरी विद्या वापरली तर त्याचे गंभीर परिणाम होतात. अशा शब्दात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा डीसीसी बँक चेअरमन पदाच्या निवडीनंतर शंभूराज देसाईंसह महायुतीच्या नेत्यांना डिवचलं आहे. ऱ्या
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता महायुती सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये वाद चव्हाट्यावर आला आहे. सातारा जिल्हा बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बुधवारी (ता.18 नोव्हेंबर) पार पडली. याच निवडीनंतर साताऱ्यात नवा वाद पेटला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी आगपाखड केली आहे.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, चेअरमन पदाच्या निवडीच्या चर्चेत मुख्यमंत्री व महायुतीसोबत शिवेंद्रराजे भोसले हे होते. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढलो. त्यामुळे शिवेंद्रराजेंना याबाबत अधिकृत माहिती आहे, असे म्हणत जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत शिवेंद्रराजेंकडे बोट केले आहे.
तसेच , जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा बँक निवडणूक याचा परस्पर संबंध नाही. दोन्ही निवडणुका वेगळ्या आहेत. ही निवडणूक शेवटची नाही. आगे आगे देखो होता है क्या.. असा कडक इशाराही यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक उदयसिंह पाटील निंबाळकर तर,व्हाईस चेअरमनपदावर शिवसेनेच्या दीपक चव्हाण यांची निवड झाली. या निवडणुकीत शिवसेनेनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळचा वचपा आता सातारा जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदांच्या निवडीत भाजपला डावलण्यात आल्याच्या चर्चेदरम्यान शंभूराज देसाई यांनी "काही जखमा जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात" असं सूचक वक्तव्य केलं होतं. तसेच राजकारणाचे जोडे बँकेच्या बाहेर ठेवून सहकार मंदिरामध्ये बँकेची प्रगती कायम ठेवण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.