Jaykumar Gore on Rajendra Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Akluj Vijay Chowk sabha : अकलूजच्या विजय चौकात सभा घेण्याबाबत जयकुमार गोरेंनी दिला राजेंद्र राऊतांना तो महत्वपूर्ण सल्ला...

Jaykumar Gore advice to Rajendra Raut : विधान परिषद निवडणुकीतील विजयानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना अकलूजच्या विजय चौकात विजयी सभा घेण्याचा सल्ला दिल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 August : विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आव्हान दिले होते.

त्यावेळी झालेल्या प्रचारात जिल्हा बॅंकेच्या अनुषंगाने मोहिते पाटील यांनी राऊत यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना राजेंद्र राऊत यांनी अकलूजच्या विजय चौकात विजयी सभा घेण्याचे चॅलेंज दिले होते. विजयानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना अकलूजच्या विजय चौकात विजयी सभा घेण्याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना विधान परिषद निवडणुकीत आमदार राजेंद्र राऊत यांनी विजयी झाल्यानंतर अकलूजच्या विजय चौकात पहिली विजयी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत विचारल्यानंतर गोरेंनी थेट राऊतांना सल्ला दिला.

पालकमंत्री गोरे म्हणाले, आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं होतं, की विजयी झाल्यानंतर अकलूजला जाऊन सभा घेऊ. पण एक मित्र म्हणून त्यांना मी सांगतो, सल्ला देतो की, द्वेषाचं राजकारण करायचं नसतं. आता निवडणूक झालेली आहे.

अकलूजमध्ये सभा घेण्याची आता गरज नाही. सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी त्या सभेपेक्षा त्यापुढे जाऊन त्यांना (मोहिते पाटील) उत्तर दिलं आहे, त्यामुळे अकलूजमध्ये जाऊन सभा घेऊन त्यांना उत्तर देण्याची गरज नाही, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

अभिजीत दीपके आणि शिवसेना नेते संजय शिरसाट, उदय सामंत यांच्या भेटीबाबत मला माहिती नाही. पण, अनेक लोक देशांमध्ये आणि राज्यांमध्ये अनेक पक्षाचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही लोक विद्यार्थ्यांच्या चळवळीचा सारा घेऊन अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टोला लगावला.

देशातला युवक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कायम राहिला आहे. तो आताही मोदींसोबतच आहे आणि यापुढील काळातही राहील, असेही गोरेंनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT