

Solapur, 03 August : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे बॅंक योग्य माणसांच्या हाती जावी, ज्यांनी बँकेचं वाटोळं केलं. त्या लोकांना परत बँकेत काम करण्याची संधी मिळू नये, यासाठी भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांसह निवडणूक लढवेल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले.
सोलापूर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण आणू नये, असं माझं मत आहे. शेतकऱ्यांचे हित आणि सहकार चळवळ जीवंत राहण्यासाठी प्रयत्न राहील, त्यामुळे बॅंकेची निवडणूक भाजप आणि सहकारी पक्षांना घेऊन निवडणूक लढणार आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये सध्या अनेक सक्षम लोक काम करत आहेत आणि ते लोक सक्षमपणे बँक चालवू शकतात. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतही काही लोकांचा इगो आडवा येऊ शकतो. पण परमेश्वर अशा सर्व लोकांना सुदबुद्धी देवो, असं म्हणत गोरे यांनी मोहिते पाटलांना टोला लगावला.
ते म्हणाले, काही लोक अबाधीअबाध राहण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा मैदानात लढाई होते, त्यावेळी स्वतःला आजमावण्याची संधी येत असते. जिल्ह्याने आता भाजप आणि सहकाऱ्यांची ताकद बघितलेली आहे. ती ताकद जिल्ह्यानेच दिलेली आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपची ताकद बघितली आहे, त्या निवडणुकीत अनेक लोकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. पण, 'गिरे तो भी टॉग ऊपर..' या प्रमाणे अनेक लोकं गॉगल घालून बातम्या देतात, असा चिमटाही गोरेंनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना लगावला.
सोलापूर जिल्हा बॅंक ही जिल्ह्याची आणि शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. ज्यांनी बॅंकेच्या कामकाजात अनियमितता केली आहे. ज्यांच्याकडं कोणाचं बॅंकेचं देणं आहे, त्यांना ते द्यावेच लागेल; अन्यथा त्यांना त्याचं फळ भोगावं लागेल, असा इशाराही थकबाकीदार बड्या कर्जदारांना लगावला.
जिल्हा सहकारी दूध संघाला उर्जितावस्था आणण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असेही पालकमंत्री गोरे यांनी या वेळी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.