विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या टीकेला मी फलटणमध्ये जाऊन आव्हान देणार आहे. रामराजेंचे आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांची विधाने त्यांच्या उंचीला शोभतात का? असा टोला माणमधील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला आहे.
आमदार जयकुमार गोरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. येत्या 25 फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते जिहे-कठापूरच्या सिंचन योजनेच्या पाण्याचे जलपूजन आंधळी धरण येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या टीकेलाही उत्तर दिले.
रामराजेंचे आणि माझे मैत्रीचे संबंध तुम्हाला सगळ्यांना महिती आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जास्त काही बोलाव असं वाटत नाही. त्यांची विधाने त्यांच्या उंचीला शोभतात का, असा प्रश्न आमदार जयकुमार गोरे यांनी केला. रामराजे अनेकांना सांगतात की, गोरे किंमत ठेवत नाहीत. शेवटी ही गिव्ह ॲण्ड टेक पॉलिसी असते. किंमत द्यावी लागते तेव्हा किंमत मिळते, असा सल्ला देत त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आता भूमिका मांडण्याची वेळ माझी आहे, आणि ती मी फलटणमध्ये जाऊन मांडणार आहे, असा थेट इशाराच जयकुमार गोरे यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर हे खासदार होऊ नयेत यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाबाबत त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी रामराजे आमच्याबरोबर नव्हते तरीही रणजितसिंह खासदार झाले. तेव्हाही खासदार भाजपचाच होता आणि आताही भाजपचाच असणार आहे. सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यास भाजप सक्षम आहे. त्यामुळे येथील उमेदवार आमच्याच पक्षाचा असेल, असेही आमदार गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.