jaykumar Gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore Vs Ramraje Nimbalkar News: जयकुमार गोरे म्हणतात, हू इज रामराजे?

Bjp News: सत्ताधारी विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता महायुतीमधील घटक पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करीत असल्यामुळे नागरिकांची करमणूक होत आहे.

सरकारनामा ब्युरो

रुपेश कदम

Maan BJP News : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांतच होणार असल्याने निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच फड चांगलाच तापला आहे. सत्ताधारी विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता महायुतीमधील घटक पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करीत असल्याने यामुळे नागरिकांची चांगलीच करमणूक होत आहे.

हू इज रामराजे ? तू कोण ठरवणार ? आमचा पक्ष ठरवेल कोणाला तिकीट द्यायचे. आम्ही पक्षात नसताना तिकीट घेतले आहे, आता तर या पक्षात आहोत. आम्ही फक्त निवडून देणार नाही. तुम्ही नसताना निवडून आणले आहे. आता तर बघा लीड किती घेतोय ? अशा शब्दांत आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांचा समाचार घेतला.

दहिवडी येथे माण पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप दहिवडी मंडलाध्यक्ष गणेश सत्रे व म्हसवड मंडलाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, 'सिद्धनाथ'चे अध्यक्ष अरुण गोरे, अर्जुन काळे, वडूजच्या नगराध्यक्षा मनीषा काळे आदी उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, 'नियंत्रण सुटलेला एक राजा फलटणमध्ये आहे. त्याच्या डोळ्यादेखत रणजितदादा खासदार झालेत तर मी तीनदा आमदार झालो आहे. आज त्याला तहसीलदार सोडा तलाठी पण विचारत नाही. रणजितदादाला तिकीट जाहीर झाल्यावर त्याला कृपामाईच्या हाॅस्पिटलमध्ये पाठवावे लागेल.

या भागात रणजितसिंह नाईक-निंबाळकरसारखा खासदार, जयकुमार गोरेंसारखा (Jaykumar Gore) आमदार असला पाहिजे, हे तालुक्यातील नागरिकांचे मत आहे. त्यामुळे चाळीस हजारांची आघाडी धरून चाला. मग विरोधी उमेदवार तालुक्यातील असला तरी हरकत नाही. माढ्याचे खासदार म्हणून सर्वात चांगले काम रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik-Nimbalkar) म्हणाले, माढ्याच्या लढाईत मी अर्जुन असलो तरी श्रीकृष्णाच्या भूमिकेत जयाभाऊ होते. २०१९ ला माढ्याचे गणित कुणी सोडवले तर ते जयाभाऊंनीच सोडवले होते, असे सांगत त्यांनी आमदार गोरेंच्या भूमिकेचे कौतुक केले.

(Edited By: Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT