Jaykumar Gore : 'वीस वर्षे सत्ता असताना तथाकथित नेते झोपले होते का..?' जयकुमार गोरेंचा टोला कुणाला?

Satara BJP News : माण, खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी लगावला टोला.
Jaykumar Gore  : 'वीस वर्षे सत्ता असताना तथाकथित नेते झोपले होते का..?' जयकुमार गोरेंचा टोला कुणाला?
Published on
Updated on

Satara BJP News : राज्यात आणि केंद्रात सरकार आपलेच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औंधसह 16 गावांसाठी सव्वा टीएमसी पाणी आरक्षित करुन या योजनेसाठी निधी देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे इथल्या जनतेला वचन दिल्याप्रमाणे जयकुमारच या भागाला पाणी देणार आहे. आजपर्यंत चुकीच्या लोकांच्या नादी लागून चुकीचा मार्ग निवडल्यानेच हा भाग पाण्यापासून वंचित राहिला. वीस वर्षे औंधमध्ये सरकार येत होते. मात्र, पाण्यासाठी कुणी बंगल्यावर मोर्चा काढला नाही, असा टोला माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.

सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.  जयकुमार गोरे म्हणाले, औंधसह 16 गावांच्या पाणीयोजनेसाठी मी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. इथल्या काही लोकांनी चुकीच्या माणसांच्या नादाला लागून चुकीचा मार्ग निवडला होता. मी तत्कालीन राज्यपालांपर्यंत आंदोलकांना घेऊन जात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागणीवरुन या भागासाठी सव्वा टीएमसी पाणी आरक्षित केले आहे. आता पाणीयोजनेसाठी निधी मिळावा म्हणून मी विधानसभेत मागणी करताच पुतना मावशीचे प्रेम आणून काहींनी मोर्चाची स्टंटबाजी केली. वीस वर्षे सरकार असताना हे तथाकथीत नेते झोपले होते का. विरोधकांना माझी इतकी ॲलर्जी का आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jaykumar Gore  : 'वीस वर्षे सत्ता असताना तथाकथित नेते झोपले होते का..?' जयकुमार गोरेंचा टोला कुणाला?
Loksabha Election 2024 : जानकर करणार निंबाळकरांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन; माढ्यातून निवडणूक लढणार...

दहिवडीतील फडणवीस यांच्या सभेत मी मागणी करुन कुकुडवाड, मायणी, कलेढोणसह 42 गावांना पाणी देण्यासाठी निधी मिळवला होता. पुन्हा ते आपल्या भेटीला लवकरच येत आहेत. आता त्यांच्याकडून औंधसह 16 गावांच्या पाणी योजनेसाठी निधी मिळवणारच आहे. कुरोलीसह वंचित गावांचा जिहेकठापूर योजनेत समावेश करणार आहे. माणगंगा (Man) आणि येरळा नदी प्रवाही करण्याबरोबरच हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवणार आहे. आता या पाण्याची चाचणी सुरु आहे. त्यामुळे माण आणि खटाव अशा दुजाभावाचे राजकारण कुणी करु नये, असा इशाराही जयकुमार गोरे (Jaykumar Gore ) यांनी दिला.

जनता माझ्याबरोबर...विरोधात फक्त नेतेच...

प्रत्येक निवडणुकीत मी पाणी आणण्याचे उद्दिष्ट ठेवून झपाटून काम करत आलो आहे. पाण्याबाबत जनतेला दिलेला प्रत्येक शब्द मी पाळला आहे. विरोधक फक्त मला पराजित करायचे उद्दिष्ट ठेवतात. त्यात त्यांना यश येणार नाही. आता जनता आणि कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत. विरोधात फक्त नेतेच राहिले असल्याचेही आमदार गोरे यांनी सांगितले.

Edited By : Rashmi Mane

Jaykumar Gore  : 'वीस वर्षे सत्ता असताना तथाकथित नेते झोपले होते का..?' जयकुमार गोरेंचा टोला कुणाला?
Raju Shetti News : ...तर अधिकाऱ्यांना झोडपून काढणार; राजू शेट्टींचा थेट इशारा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com