Sangli News : काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी पक्ष सोडताना काँग्रेस पक्षात अन्याय झाल्याचे म्हटलं होतं. त्यावरून काँग्रेसचे शहर आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार टीका केली होती. त्यावर आता भाजपने पटलवार केला आहे. भाजप नेते किशोर शहा, संतोष पाटील, उत्तम साखळकर यांनी यावरून निशाना साधत आहे. तर जयश्रीताईंवर टीका करणारे पृथ्वीराज पाटील भाजप नेत्यांचे उंबरे झिजवूनही 'वेटिंग' वरच असल्याचा टोला लगावला आहे. यावेळी जयश्री पाटीलसमर्थक माजी उपमहापौर प्रशांत पाटील, माजी नगरसेवक प्रकाश मुळके, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, उदय पाटील उपस्थित होते. (Jayshree Patil joins BJP sparking political clash as Congress leader Prithviraj Patil criticizes move and BJP hits back)
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजप प्रवेशासाठी चार महिने धडपडत होते. जयश्री पाटलांच्या प्रवेशाच्या दिवशीही ते मुंबईत काय करत होते. ते कोणाकडे होते? याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे ज्यांनी आमच्या नेत्यांचे उंबरे झिजवले ते अद्यापही वेटिंगवरच आहेत. सध्या नाईलाजाने काँग्रेसमध्ये असल्याचा टोला शहा यांनी लगावला आहे. तसेच त्यांची नार्को टेस्ट केल्यास त्यांनी कसा 75 हजार मतदारांचा अपमान केला. याचे सत्य बाहेर येईल असाही दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
शहा, पाटील, साखळकर यांनी, पृथ्वीराज पाटील हे भाजप प्रवेशासाठी जिल्ह्यातील आमदार, भाजपचे एक मोठे पदाधिकारी, मुंबईतील विधान परिषदेचे आमदार यांच्यामागे फिरत होते. ते भाजप प्रवेशासाठी धडपडत होते. याबाबत आधी त्यांनी खुलासा करावा. जयश्रीताईंच्या प्रवेशावेळीच आपल्याही प्रवेशासाठी त्यांनी फिल्डिंग लावण्यासाठी मुंबई गाठली होती, असा दावा केला आहे.
तसेच पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभव झाला असून गेल्या दहा वर्षांपासून ते शहर जिल्हाध्यक्ष आहेत. पराभव होवूनही ते पद काही सोडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता त्यांनी अध्यक्षपद सोडून सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी. काँग्रेसने फक्त वसंतदादा घराण्यालाच दिलं असं नाही तर तुमच्या घरात खासदारकी, मंत्रिपद दिले होते. जिल्हाध्यक्षपद दिलं. पण तुम्हाला साधा नगरसेवक निवडून आणता आला नाही, असाही टोला लगावला आहे.
तर जयश्री का गेल्या या पेक्षा तुम्ही स्वतःच्या संस्था आणि मुंबईमधील सिडकोच्या जागेत नवीन होत असलेल्या आपल्या संस्था वाचवण्यासाठी भाजप नेत्यांचे उंबरे झिझवत असल्याचा आरोपही शहा, पाटील, साखळकर यांनी केला आहे. तसेच काँग्रेसमध्ये राहून लोकसभेला पृथ्वीराज पाटील यांनी कोणाचा प्रचार केला? हे देखील जनतेला माहित असल्याचेही टीका शहा, पाटील, साखळकर यांनी केली आहे.
जयश्री पाटील यांनी पक्ष सोडताना काँग्रेस पक्षात अन्याय झाल्याचे म्हटलं होतं. त्यावरून पृथ्वीराज पाटील यांनी, वसंतदादा घराण्याला काँग्रेसने चारवेळा मुख्यमंत्रीपद, केंद्रात मंत्रीपद, आमदार, खासदार, सांगली महापालिकेचे नेतृत्व दिले. इतकं देवूनही जयश्रीताई म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला. तर काँग्रेसने असा अन्याय आमच्यावरही करावा, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.