-रूपेश कदम
Dahiwadi News : जिहे-कटापूर योजनेचे पाणी येत्या पंधरा दिवसांत माणमध्ये खळाळणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी दिली.
म्हसवड येथील एका कार्यक्रमात आमदार गोरे यांनी ही माहिती दिली. आमदार गोरे म्हणाले, जिहे-कटापूरचे Jihe Katapur काम अंतिम टप्प्यात आहे. बोगद्याचे फक्त पाच मीटरचे काम शिल्लक आहे. ज्या दिवशी बोगद्याच्या कामाचा शेवटचा स्फोट करण्यात येईल, त्या दिवशी माणच्या भूमीत जिहे-कटापूरचे पाणी येण्याचा मार्ग मोकळा होईल.
हे पाणी माणगंगा नदीत, आंधळी धरणात येवून थांबणार नाही. तर हे पाणी शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचलं पाहिजे, या आमच्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली आहे. येणारे पाणी हे माणच्या उत्तरेच्या ३२ गावांमधील शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर याचे उद्घाटन करून जिहे-कटापूरचे पाणी माणमध्ये Maan Taluka आणण्यात येईल.
मुंबई - बेंगळूर-मुंबई कॉरिडॉरबाबत बोलताना आमदार गोरे यांनी सांगितले की, माणचा चेहरामोहरा बदलणारा, पंचवीस हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा कॉरिडॉर म्हसवड Mhaswad Corridor येथे होणार आहे. तब्बल साडेतीन हजार कोटी रुपये या कॉरिडॉरच्या पायाभूत सुविधांसाठी मिळणार आहेत. आमचा कोरेगावच्या एमआयडीसीला विरोध नव्हता व नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.