Maan : जयकुमार गोरेंचे प्रयत्न; फडणवीसांनी माण-खटावला दिला छप्पर फाडके निधी...

Jaykumar Gore डॉक्टरांना विनंती करुन आमदार गोरेंनी दोन तासांसाठी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आणि बैठकीला हजर झाले.महत्वाच्या बैठकीतून त्यांनी मतदारसंघातील कामांसाठी मोठा निधीही मिळवला.बैठक संपताच पुन्हा ते रुग्णालयात दाखल झाले.
Jaykumar Gore, Devendra Fadanvis
Jaykumar Gore, Devendra Fadanvissarkarnama
Published on
Updated on

Maan News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी माण - खटाव मतदारसंघातील ३२ गावांसाठी टेंभू पाणी योजनेच्या कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसह उरमोडी योजनेच्या बंदीस्त पाईपलाईन पाणी वितरणासाठी तब्बल ७०० कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. मतदारसंघात वीजवितरणासाठी तीन नवीन सबस्टेशन आणि २५० डीपी बसविण्यासाठी मान्यताही त्यांनी दिली. आमदार जयकुमार (Jaykumar Gore) यांच्या प्रयत्नाने मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिहे कठापूर योजनेच्या उत्तर माणमधील वाढीव कामांच्या निविदांना मान्यता देण्याचे नियोजनही करण्यात आले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात माण-खटाव मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार शहाजीबापू पाटील आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार गोरे यांच्या मागणीनुसार खटाव तालुक्यातील कलेढोणसह १६ आणि माण तालुक्यातील कुकुडवाडसह १६ गांना टेंभू योजनेचे पाणी देण्यासाठी सर्व्हे करण्याचे मार्च २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते. हा सर्व्हे झाला असून या कामांसाठीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश फडणवीस बैठकीत दिले.मार्चमध्ये प्रस्ताव पारित करुन टेंभू योजनेच्या प्रस्तावित कामांना निधी उपलब्ध केला जाणार आहे.

Jaykumar Gore, Devendra Fadanvis
Phaltan News: निरा देवघरचे पाणी व्हाया धोम बलकवडी येणार; रणजितसिंह निंबाळकरांचा करिष्मा

माण-खटावमध्ये उरमोडीचे पाणी गरज लागेल तेव्हा सोडण्यात येते.सध्या हे पाणी ओपन कॅनॉलमधून वितरित केले जातेत्यामुळे वाठार किरोलीपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो.वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी हे पाणी बंदिस्त पाईपलाईनमधून वितरित करण्याचा प्रस्ताव आ.जयकुमार गोरे यांनी मांडला होता.त्यासाठी ७०० कोटींचा निधी देण्याचे फडणवीस यांनी मान्य केले.तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Jaykumar Gore, Devendra Fadanvis
Maan : म्हसवड-पंढरपूर महामार्गाचे निकृष्ट काम; आमदार गोरेंची थेट गडकरींकडे तक्रार

माण-खटावमध्ये सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने शेतीपाण्यासाठी लागणाऱ्या वीजवितरणावर ताण येत आहे. अखंडित वीजपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याने नवीन सबस्टेशन्स आणि डीपी देण्याची मागणी आमदार गोरे यांनी केली. त्यावर तीन नवीन सबस्टेशन्स आणि २५० डीपी देण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. उत्तर माणमधील ३२ गावांना आंधळी धरणातून लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर योजनेचे पाणी देण्यासाठी वाढीव कामांची निविदा काढण्यात आली होती.या निविदेला शासनाची चार दिवसात मान्यता देणार असल्याचे फडणवीस यांनी बैठकीत जाहीर केले.

Jaykumar Gore, Devendra Fadanvis
Satara : हक्काचे पाणी पवारांनी बारामतीला पळवले; मुख्यमंत्री शिंदेंमुळे खंडाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी...

बैठकीनंतर बोलताना आमदार गोरे म्हणाले, मंत्रालयातील बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माण-खटावमधील मोठ्या कामांसाठी छप्पर फाडके निधी दिल्याने पाणी योजनांसह वीजवितरणाची कामे मार्गी लागणार आहेत.३२ गावांना टेंभू योजनेचे पाणी लवकरच मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.वीजवितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठीही निधी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत.

Jaykumar Gore, Devendra Fadanvis
Jaykumar Gore|राष्ट्रवादीत बारामती, फलटणकरांची घराणेशाही... जयकुमार गोरेंचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com