Ashwini Jagtap
Ashwini Jagtap  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : अश्विनी जगतापांच्या विजयाने सुपन्यात आनंद; माहेरवाशीन विधीमंडळात पोहोचल्याचा अभिमान

हेमंत पवार

Karad News : पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत दिवंगत माजी आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या पत्नीअश्विनी जगताप Ashwini Jagtap या मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्या आहेत. त्यांच्या विजयाचा कराड Karad तालुक्यातील सुपनेतील Supane ग्रामस्थांना मोठा आनंद झाला आहे. सुपने गावची लेक विधिमंडळात आमदार होऊन पोहोचल्याने सुपनेकरांचा उर अभिमानाने भरुन आला आहे.

आमदार अश्विनी जगताप या सुपने येथील निवृ़त्त पोलिस उपायुक्त मारुती बंडु जाधव यांच्या कन्या आणि कऱ्हाड मर्चंटचे संचालक आकाश जयवंत जाधव यांच्या आत्या आहेत. मारुती जाधव हे पोलिस खात्यात असल्याने करारी शिस्त अश्विनीताईंमध्ये आली आहे. मारुती जाधव यांना राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक मिळाले होते.

वडील पुण्यात स्थायिक झाल्याने अश्विनीताईंचे शिक्षण पुण्यात झाले. त्यांना एक भाऊ आणि पाच बहिणी असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांची एक बहिण सौ. सुनंदा यांना कऱ्हाडधील दिवटे गल्लीतील पवार कुटुंबात दिल्या आहेत. तर अन्य बहिणी विवाहानंतर पुणे परिसरातच आहेत.

सुपनेचे आकाश जयवंत जाधव यांच्या त्या आत्या आहेत. कऱ्हाड मर्चंट संस्थेचे ते संचालक आहेत. अश्विनी जगताप या चिंचवडच्या निवडणुकीत विजयी झाल्याने कऱ्हाड तालुक्यातील सुपनेची माहेरवाशीनी विधीमंडळात पोहोचल्याने सुपनेकरांचा उर अभिमानाने भरुन आला आहे.

आमदार लक्ष्मणराव जगताप हे खुपच दिलदार आणि प्रभावी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि माझी आत्या अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विजयाचा आणि त्या विधीमंडळात गेल्याचा आम्हा सुपनेकरांना मोठा अभिमान आहे.

- आकाश जाधव (सुपने)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT