Kolhapur Lok Sabha 2024 Result Analysis
Kolhapur Lok Sabha 2024 Result Analysis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

K. P. Patil: वाकोबाला साकडं घालून शड्डू ठोकला; के. पी. पाटील हाच पक्ष म्हणून लागले कामाला..

Rahul Gadkar

Kolhapur News: लोकसभेचा निकाल झाल्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये गळ्यात गळे घालून फिरणारे आता कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

लोकसभेला मांडीला मांडी लावून प्रचारात उतरणारे विधानसभेच्या निवडणुकीला सवता सुभा मांडण्याची तयारी ठेवली आहे. कागलमध्ये विधानसभेचे वार आतापासूनच वाहत असताना आता राधानगरीत (Radhanagari) देखील माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil)यांनी विधानसभेचा षड्डू ठोकला आहे. वाकीघोल येथील वाकोबाला साकडं घालून कार्यकर्त्यांची बैठक घेत विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या त्याला तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पीछेहाट झाली. शाहू महाराज छत्रपती यांना दोन नंबरचे मताधिक्य राधानगरी विधानसभा मतदारसंघातून मिळाले. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील महायुती म्हणून एकत्र होते. पण

गेल्या वेळी झालेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीनिमित्ताने आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के पी पाटील एकमेकांच्या विरोधात होते. आगामी विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या वेळा ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून के पी पाटील यांनी आत्ताच रणशिंग फुंकले आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन या लढाईतील या लढाईतील खरे शिलेदार तुम्ही आहात तुमच्या सर्वांच्या पाठबळावर मी ही लढाई निश्चित जिंकेन. या लढाईत के. पी. हाच पक्ष, के. पी. हेच चिन्ह आणि के. पी. पाटील हाच झेंडा असेल," असे सांगून साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मतदारसंघावरील गद्दारीचा लागलेला कलंक मिटवूया!असे आवाहन यावेळी केले.

माजी आमदार के. पी. पाटील हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात लढत आहेत. त्यापूर्वी दोन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र 2014 आणि 2019 मध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांनी त्यांचा पराभव केला आहे.

विशेष म्हणजे आमदार प्रकाश आबिटकर हे माजी आमदार के. पी. पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जात होते. मात्र कार्यकर्त्यांनीच पराभव केल्याचा राग त्यांच्या मनात आहे. शिवाय कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आबिटकर यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांच्याविरोधात रणशिंग फुंकले होते. याचाच राग आता के.पी. पाटील यांना आहे. त्यामुळे राज्यात महायुती टिकेल अथवा न टिकेल याच्या विश्वासावर न बसता आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT