Ajit Pawar: अजितदादांना बारामतीतच कोणी दगा दिला?

Baramati Lok Sabha 2024 Result Analysis: सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ करण्यात अजितदादांना अपयश आले. त्यांनी कार्यंकर्त्यांपेक्षा पदाधिकाऱ्यांना अधिक जवळ केले. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता त्यांच्यापासून काहीसा दूर होता, असे बोलले जाते.
Baramati Lok Sabha 2024 Result Analysis
Baramati Lok Sabha 2024 Result AnalysisSarkarnama
Published on
Updated on

Baramati Lok Sabha 2024 : देशात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ होता. शरद पवार विरुद्ध अजित पवार (Sharad Pawar Vs Ajit Pawar) यांच्या लढतीत बारामती कुणाची याचा फैसला बारामतीकरांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला.

सुप्रिया सुळेंना सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळालं. अजित पवार (Ajit Pawar) ज्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या ठिकाणी सुळे यांनी 47 हजाराहून जास्त मतधिक्य घेतलं आहे. यामुळे अजितदादाचे त्यांच्याच होमटाऊनमध्ये राजकीय वजन कमी झाले का असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यांना कोणी दगा दिला, यांची चर्चा सरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघातच पराभव झाला. तब्बल एक लाख 58 हजारांच्या फरकाने सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी झाल्या.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडणे बारामतीकरांना रुचले नसल्याचे या निकालावरुन दिसते. महायुतीबरोबर जाऊन अजित पवार यांनी स्वतंत्रपणे लढवलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना अपयश का आले यांची चिंतन सध्या सुरु आहे.

अजित पवार यांचे होमटाऊन असलेल्या बारामतीत सुनेत्रा पवार यांना ९६ हजार ५४० एवढे मताधिक्य मिळाले तर सुप्रिया सुळे यांना १ लाख ४३ हजार ९४१ इतके मताधिक्य मिळाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सुळे यांना १ लाख ७४ ५६६ इतके मताधिक्य होते, तर त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना ४७ हजार ०६८ इतके मताधिक्य मिळाले होते.

अजितदादांनी सर्व यंत्रणा प्रचारात सक्रिय होती. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत असलेल्या कोणी दगाबाजी केली, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे.बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादांसह महायुतीचे प्रबळ नेते सपशेल फेल ठरले.

शरद पवारांनी साथ सोडून अजितदादांसोबत अनेक जण भाजपमध्ये गेले. पवार एकटे असताना त्यांच्या बाजून सहानुभूतीची लाट आणि सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात केलेली कामे यांचा फायदा सुळे यांनी विजयी ठरविण्यात फायदेशीर ठरला.

Baramati Lok Sabha 2024 Result Analysis
Gowal Padavi: काँग्रेसच्या नव्या खासदाराला आशीर्वाद देताना शिंदे गटातील नेत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू!

अजित पवार यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या काही मित्रांनी केलेल्या दगाफटक्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ करण्यात अजितदादांना अपयश आले.

त्यांनी कार्यंकर्त्यांपेक्षा पदाधिकाऱ्यांना अधिक जवळ केले. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता त्यांच्यापासून काहीसा दूर होता, असे बोलले जाते. तर त्यांच्या सोबत असलेल्या काही जणांनी अलिप्त राहून दगा दिला अशीही चर्चा आहे.

बारामतीची जागा मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून थेट दिल्लीतून भाजप पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरु होते. त्यासाठी 'मिशन बारामती'राबविण्यात आले. पण शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्यात भाजपला अपयश आले.

बारामती लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी

एकूण झालेले मतदान - 14 लाख 12 हजार 875

सुप्रिया सुळे एकूण मतदान - 7 लाख 32 हजार 312

सुनेत्रा पवार एकूण मतदान - 5 लाख 73 हजार 979

बारामती ( अजित पवार)

सुप्रिया सुळे -1लाख 43 हजार 941

सुनेत्रा पवार - 96 हजार 560

(लीड सुप्रिया सुळे 47 हजार 381)

दौंड विधानसभा (राहुल कुल- भाजप)

सुप्रिया सुळे -92 हजार 64

सुनेत्रा पवार - 65 हजार 727

(लीड सुप्रिया सुळे 26 हजार 337)

इंदापूर (दत्ता भरणे- राष्ट्रवादी अजित पवार)

सुप्रिया सुळे - 1 लाख 14 हजार 20

सुनेत्रा पवार - 88 हजार 69

(लीड सुप्रिया सुळे 25 हजार 951)

भोर (संग्राम थोपटे- काँग्रेस आमदार)

सुप्रिया सुळे -1लाख 34 हजार 245

सुनेत्रा पवार - 90 हजार 440

(लीड सुप्रिया सुळे 43 हजार 805)

खडकवासला (भीमराव तापकीर- भाजप)

सुप्रिया सुळे - 1लाख 21हजार 182

सुनेत्रा पवार - 1लाख 41हजार 928

(लीड सुनेत्रा पवार 20 हजार 746)

पुरंदर (संजय जगताप- काँग्रेस)

सुप्रिया सुळे -1लाख 25 हजार 948

सुनेत्रा पवार - 90 हजार 667

(लीड सुप्रिया सुळे 35 हजार 281)

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांनी एकूण मिळवलेले मताधिक्य - 1 लाख 58 हजार 333

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com