Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kagal Assembly Election 2024: राजकारणाची धग पोहोचली कुटुंबापर्यंत ! कागलच्या जागेवरून बाप-लेकामध्ये मतभेद

Virendra Mandalik vs Sanjay Mandalik over Hasan Mushrif Candidacy: वीरेंद्र मंडलिक यांच्या मेळाव्यानंतर माजी खासदार मंडलिक आणि हसन मुश्रीफ एकाच व्यासपीठावर आल्यानंतर संजय मंडलिक काय भूमिका घेतील याकडे लक्ष होते. कारण वीरेंद्र मंडलिक यांच्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी होती.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढत होत असतानाच राजकारणाची धग आता कुटुंबापर्यंत येऊन पोहोचली आहे. नुकताच माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक (Virendra Mandalik) यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या विरोधात मेळावा घेत उमेदवारीवर दावा केला.

पालकमंत्री मुश्रीफ साहेब आता तुम्ही थांबा, मंडलिक गटाचे उपकार फेडा, असे विधान करत स्वतः कागल विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. याला दोन ते तीन दिवस उलटले असतानाच माजी खासदार संजय मंडलिक यांनीच पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या व्यासपीठावर जाऊन मुश्रीफांना मदत करण्याचं बाहेर आवाहन केले आहे. त्यामुळे राजकारणाची धग आता कुटुंबापर्यंत पोहोचली असून पिता-पुत्रांमध्ये मत मतांतर असल्याचे दिसून आले आहे.

नुकताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सांगाव येथे जाहीर कार्यक्रम झाला. या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. वीरेंद्र मंडलिक यांच्या मेळाव्यानंतर माजी खासदार मंडलिक (Sanjay Mandalik) आणि हसन मुश्रीफ एकाच व्यासपीठावर आल्यानंतर संजय मंडलिक काय भूमिका घेतील याकडे लक्ष होते.

कारण संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांच्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी होती. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची मागणी ही कार्यकर्त्यांनी केली होती.

मात्र या कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी,राज्यात पुन्हा महायुतीचा सरकार यावं आणि त्यात हसन मुश्रीफ असावेत. त्यासाठी अत्यंत ताकदीने हसन मुश्रीफ यांना मदत करा, असे जाहीर सभेत संजय मंडलिक यांनी वक्तव्य केल्यानंतर पिता पुत्रा मधील मत मतांतर उघड झाले आहेत.

संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी मात्र महायुतीकडून उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक मंडलिक यांना प्रामाणिकपणे मदत केली नसल्याचाही वीरेंद्र मंडलिक यांनी आरोप केला होता. वीरेंद्र मंडलिक यांच्या मेळाव्याला माजी खासदार संजय मंडलिक यांनी अनुपस्थिती लावली होती. त्याची चर्चा देखील झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT