Shiv Sena Vs NCP: घरातच सर्व पदे, कार्यकर्ते मेले आहेत का? शिवसेना नेत्याचा अजितदादांच्या आमदाराला सवाल

Shiv Sena Leader Purushottam Jadhav criticism NCP MLA Makarand Patil: वाई विधानसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार यावरून महायुतीमध्ये कुस्ती रंगणार का हे काही दिवसात समजेल.
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Satara News: वाई विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत ही जागा कोण लढवणार, यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांनी वाईच्या जागेवर दावा ठोकला आहे. महायुतीत या जागेवरुन पेच निर्माण झाला आहे.

शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र महाबळेश्वर येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेत नागरिकांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. "एकाच घरामध्ये सर्व पदे मग वाई मधील इतर कार्यकर्ते मेले आहेत का? शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांची आमदार मकरंद पाटील यांच्यावर जाहीर सभेतून टीका केली.

या जनसंवाद यात्रेमुळे वाई विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये जोरदार वाद होण्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात पुरुषोत्तम जाधव यांनी शड्डू ठोकले आहे.

वाई विधानसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार यावरून महायुतीमध्ये कुस्ती रंगणार का हे काही दिवसात समजेल, पण तोपर्यंत महायूतील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळेल.

Eknath Shinde, Ajit Pawar
Dilip Mohite: विधानसभेच्या रंगीत तालमीत अजितदादांच्या आमदाराचा पराभव; बाजार समिती हातातून निसटली

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात दोन लोकसभा मतदारसंघात येतात. साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विजयी झाले. तर, माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील दोन मतदारसंघ येतात माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत, शिवसेनेत दोन गट पडलेत त्याचा परिणाम साताऱ्यातील समीकरणांवरदेखील झाला आहे. सातारा जिल्ह्यात बदलेल्या समीकरणाप्रमाणं महायुतीचे सहा आमदार आहेत.

तर, महाविकास आघाडीकडे दोन आमदार आहेत.सातारा जिल्ह्यात सातारा, माण, फलटण, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण हे विधानसभा मतदारसंघ आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com