Crime karad
Crime karad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : जिलेटीनने एटीएम उडविण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून चोरटे पसार

-सचिन शिंदे

कऱ्हाड : कऱ्हाड ते वीटा रस्त्यावरील गजानन हौसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटिनच्या सहाय्याने उडवून देण्याचा चोरट्यांचा प्लॉन रात्र गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांनी संबंधित संशयितांना हटकले. पोलिसांनी त्यांना पकडले पण, चोरट्यांशी झालेल्या झटापटीत त्यांनी पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारल्याने तीन पोलिस जखमी झाले. याचा फायदा घेत तीन चोरटे पसार झाले आहेत. एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी सचिन अशोकराव वाघमोडे (वय 38, मुळ रा. बीड सध्या आदर्श नगर, काळेवाडी, पुणे) या संशयितांस ताब्यात घेतले आहे. तो त्याच्या चार साथीदारांसह एटीएम लुटण्यास आले होते. पहाटे तीनच्या सुमारास ते एटीएम लुटत असताना तेथे रात्रगस्त घालणाऱ्या दामिनी पथक हवालदार जयसिंग राजगे, सचिन सुर्यवंशी, चालक संग्राम पाटील, होमगार्ड श्री. निकम तेथे आले.

हवालदार राजगे यांना संशय आल्याने त्यांनी संबंधितांना हटकले. त्यावेळी चोरट्यांशी झटापट करत त्यांना पकडले. झटापटीत चोरट्यांनी त्यांच्याकडील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारल्याने तीन पोलिस जखमी झाले. याचा फायदा घेत तीन चोरटे पसार झाले. मात्र, एकाला पकडून ठेवण्यात जखमी पोलिसांना यश आले. या थरारक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. डोळ्यात स्प्रे मारल्याने जखमी झालेले पोलिस खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.

संशयितांची होंडा ट्विस्टर मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गजानन हौसिंग सोसायटीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत झाल्याची माहिती वायरलेसने पोलिसांना मिळाली. वायरेलस कक्षातील महिला पोलिसाने प्रसंगावधान राखत पेट्रोलिंग करणाऱ्या पथक व बीट मार्शल पथकास कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल घटनास्थळी दाखल झाले.

यांच्या उपस्थितीत बॉम्बशोधक व नाशक पथकाने एटीएम सेंटरमध्ये ठेवलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचे ब्लास्ट केले. यावेळी मोठा आवाज झाला. त्यापूर्वी ओगलेवाडीकडे जाणारी वाहतूक थांबवली होती. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT