Karad Hindutvavadi Sanghtna News : पुसेसावळीतून इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या आरोपींना हजर करणारे व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सर्व प्रथम अटक झाली पाहिजे. या सगळ्यांचा तपास करण्यासाठी आम्ही प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी आज कराड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, पुसेसावळी दंगलीशी पावसकरांचा संबंध नसतानाही त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी मोर्चा काढला, तर हिंदुत्ववादी संघटना त्याला प्रतिमोर्चाने उत्तर देतील, असा इशारा दिला आहे.
ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, चंद्रकांत जिरंगे, सागर आमले, राहुल यादव, काकासाहेब जाधव, रूपेश मुळे, अजय पावसकर यांच्यासह बहुसंख्य हिंदुत्ववादी संघटनांचे Hindutvavadi Sanghatna पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पावसकर म्हणाले, जमावबंदीचा आदेश लागू असताना अल्पसंख्याक समाजाचे लोक जमाव कसा गोळा करू शकतात हा आमचा प्रश्न आहे. तेव्हा प्रशासन Satara Administrator काय करत होते याचा खुलासा त्यांनी करावा.
हिंदूंनी १५ ऑगस्टला मोर्चा काढला. त्यानंतर पंधराव्या दिवशी पोस्ट टाकणाऱ्यांना जामीन झाला. त्या सगळ्यांचा उद्रेक होण्याची वेळ का येऊ दिली. त्याच त्या मुलाने पुन्हा तेच धाडस कसे काय केले, याची चौकशी झाली पाहिजे. त्या सर्वांमागे सहा व्यक्तींचा संबंध आहे.
.कोयनानगरला मध्यंतरी बॉम्ब प्रशिक्षणाचा प्रकार उघडकीस आला, त्याच्याशी यांचा संबंध आहे, असा आमचा दावा आहे. त्या अनुषंगाने चौकशी करण्याची प्रशासनाला मागणी आहे. त्यांना सातत्याने सोशल माध्यमांवरील पोस्टबाबत माहिती असते. त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे हे सगळे वातावरण गढूळ करणाऱ्या लोकांना अटक झाली पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे.
जिरंगे म्हणाले, कोणताही हिंदू पहिली सुरुवात करत नाही. मात्र, सुरुवात ज्यांच्याकडून होते त्यांच्यावर कारवाई होत नाही. याउलट सकल हिंदू समाजासाठी कार्य करणाऱ्या विक्रम पावसकरसारख्या नेत्यांवर नाहक आरोप केले जातात. त्यांना अटक करण्याची मागणी केली जाते. त्यासाठी मोर्चाचा घाट घातला जातो. ही सगळी परिस्थिती घातक आहे.
त्यामुळे त्यांनी मोर्चा काढला तर त्याला प्रतिमोर्चाने उत्तर द्यायची तयारी केली आहे. देश आणि राष्ट्र कार्यासाठी एखाद्याचा मृत्यू झाला, तर तो शहिद घोषित केला जातो. मात्र, येथे शहिदचा अर्थ वेगळा लावून त्यांनी केलेला उल्लेख चुकीचा आहे. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांमध्ये अल्पसंख्याकच का आहेत.
पुसेसावळीत काही युवकांनी आलमगिर औरंगजेब असा व्हाॅट्सअॅप ग्रुप काढला होता. तो काय देशभक्तीचे प्रतीक होते का. त्या ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. तेही टाळले जात आहे. या वेळी राहुल यादव, काकासाहेब जाधव व रूपेश मुळे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.