Pusesavali News : पुसेसावळीला अस्वस्थ करणारा मास्टरमाइंड कोण? शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान...

Khatav Taluka News: खटाव तालुक्यातील पुसेसावळी हे तसे बाजारपेठेचे गाव. गावचा चार हजारांचा उंबरा तर १५ हजारांच्या आसपास लोकसंख्या.
Pusesavali Villege
Pusesavali Villegesarkarnama
Published on
Updated on

-सचिन शिंदे

Satara Pusesavali News : गावात चार हजार उंबऱ्यांपैकी अल्पसंख्याक समाजाची केवळ १०० घरे आहेत. असे असतानाही त्यांची भीती घालून वाढलेल्या वेगळ्या प्रकारची मानसिकता तयार करणारा मास्टरमाइंड बाहेरचा आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे. सोशल माध्यमावरील त्या पोस्टचा तपास सुरू असतानाच दंगल घडल्याने त्यामागचा मास्टरमाइंड वेगळा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दंगलीसहीत पुसेसावळीला अस्वस्थ करणारा मास्टरमाइंड कोण? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

खटाव तालुक्यातील पुसेसावळी Pusesavali हे तसे बाजारपेठेचे गाव. गावचा चार हजारांचा उंबरा, तर १५ हजारांच्या आसपास लोकसंख्या. गावात Villege अत्यंत शांततेचे नेहमीच वातावरण असते. अलीकडच्या काही काळात गावात शिरलेल्या अपप्रवृत्ती अत्यंत घातक ठरल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यात अत्यंत टोकाचा विचार मांडणाऱ्यांकडून त्याला पाठबळ मिळत होते.

रविवारी त्या सगळ्यांचा उद्रेक झाला. रात्री अंधारात उसळलेल्या दंगलीत सारा गाव भेदरला आहे. दंगलीतील जमावाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर केलेच, त्याशिवाय ठरावीक कुटुंबे रात्रभर दहशतीखाली राहिली. अत्यंत निर्दयी जमावाने कशाचाही विचार न करता केलेली जाळपोळ, मोडतोड, दगडफेक व त्यांची घोषणाबाजी पुसेसावळीची शांतता भंग करणारी ठरली.

गावात येतानाच प्रशस्त दत्त चौक लागतो. त्यानंतर सुरू होते, मुख्य बाजारपेठेतून रस्ता थेट गावात जातो. तेथे वर्षानुवर्षांची मिश्र लोकवस्ती आहे. मात्र, बहुसंख्य व अल्पसंख्याक असा भेदभाव गावात कधीच नव्हता. मात्र, सामाजिक माध्यमांनी गावातील वातावरण ढवळून काढले. काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पोस्ट पडली. त्या पोस्टबद्दलची चौकशी सुरू असतानाच दंगल घडली.

त्यानंतर गावात सभा झाली अन् तेथून पुढे तुझे-माझे सुरू झाले. ज्या गावात अधिक मास एकत्रित साजरा केला, त्याच गावात हा प्रकार घडला. दंगलीपूर्वी तीनच दिवस आधी काही ठराविकांकडून धोका आहे, अशा आशयाची तक्रार पोलिस अधीक्षक, उपअधीक्षकांसहीत पोलिसात देण्यात आली होती.

त्याकडे पोलिसांनी फारशा गांभीर्याने पाहिले नाही, त्यामुळे त्याचे दंगलीत रूपांतर झाल्याचे वास्तव आहे. शांत, संयमी व सलोख्याच्या गावातील शांतता कोणाला नको आहे, त्यामागचा मास्टरमाइंड कोण आहे? या सगळ्यांचा शोध घेण्याची मागणी स्थानिक पुसेसावळीकर करत आहेत. त्यामुळे दंगलीमागच्या मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.

Pusesavali Villege
Satara Pusesavali News: पुसेसावळी दंगलप्रकरणी पावसकरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com