अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील विधानपरिषद निवडणूक जवळ आली आहे. विद्यमान आमदार अरुण जगताप यांचा कार्यकाळ डिसेंबर अखेर संपत आहे. त्यामुळे इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. भाजपकडून सध्या माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित समजले जात आहे. त्या अनुशंगाने शिवाजी कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील नेते मंडळींना बुऱ्हाणनगर येथे फराळाला बोलावले होते. हा राजकीय फराळ आज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. Kardile filled Vikhe with sweets
विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारांसंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाला मागविली होती. ही माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविली आहे. त्यामुळे आता कर्डिले निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
शिवाजी कर्डिले दर वर्षी दिवाळी फराळाचा कार्यक्रम घेतात. मात्र यंदाच्या फराळ कार्यक्रमाला विधानपरिषद निवडणुकीची राजकीय पार्श्वभूमी आहे. कर्डिलेनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना दिवाळी निमित्त मिठाई पाठविली. तसेच फराळाच्या कार्यक्रमालाही आमंत्रण दिले होते. त्यानुसार आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. सुजय विखे पाटील बुऱ्हाणनगरला आले होते.
या प्रसंगी फराळाच्या पंगतील खासदार विखे पाटील बसले होते. त्यांना कर्डिले यांनी फराळाचा घासही भरवत तोंड गोड केले. विधानपरिषद निवडणुकीत नगरपालिका व जिल्हा परिषद सदस्य मतदारांची संख्या जास्त आहे. यात विखे यांच्या समर्थकांची संख्या लक्षणिय आहे. त्यामुळे या निवडणुकीत विखे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ही बाब लक्ष्यात घेता कर्डिलेंचा आजचा राजकीय फराळ कर्डिलेंना निवडणूक विजयाचा गोडवा देणार का हे लवकरच कळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.