Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : कऱ्हाड विमानतळावर मंत्री तीन, गेले मात्र एकच...

Shiv Sena :उदय सामंत नियोजित दौऱ्याप्रमाणे रत्नागिरीला रवाना होण्यासाठी कऱ्हाड विमानतळावर पोहोचले होते.

Vishal Patil

Karad : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगलीसह कोकणात ये-जा करण्यासाठी साताऱ्यातील कऱ्हाड विमानतळावर नेहमीच रेलचेल दिसते. आज (शुक्रवारी) दुपारी एक विमान दुपारच्या सुमारास उतरले, दुपारनंतर या विमानातून जाण्यासाठी दोन मंत्र्यांचा नियोजित दौरा होता. मात्र, या विमानातून तिसऱ्याच मंत्र्यांनी मुंबईकडे प्रस्थान केले. तेव्हा कऱ्हाड विमानतळावर एक विमान आणि तीन मंत्री मात्र नंबर शंभूराज देसाईंचा लागल्याचे पाहायला मिळाले.

शिंदे गटाचे खानापूर- विटा मतदार संघाचे विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महायुती सरकारमधील शालेय मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा दौरा नियोजित होता. विटा येथे वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यती कृषी प्रदर्शन याच्यासह अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास तिन्ही मंत्र्यांनी हजेरी लावली. त्यानंतर तिन्ही मंत्री रवाना झाले.

उद्योग मंत्री उदय सावंत हे एक वाजण्याच्या सुमारास कराड विमानतळावरती विमानाने आले होते. तर शालेय मंत्री दीपक केसरकर गाडीने प्रवास करून विटा येथे पोहोचणार होते. तेथून दोन्ही मंत्री कराड येथील विमानतळावरून पुढे रत्नागिरीला विमानाने जाणार असल्याचा नियोजित दौरा होता. परंतु अचानक शालेय मंत्री यांचा दौरा रद्द झाला आणि ते गाडीनेच पुन्हा सावंतवाडी गेले. या ठिकाणी शिक्षकेत्तर संघटनेच्या ५१ व्या अधिवेशनास उपस्थिती लावणार होते.

उद्योग मंत्री उदय सामंत नियोजित दौऱ्याप्रमाणे दुपारी पावणेतीन वाजता रत्नागिरीला रवाना होण्यासाठी कऱ्हाड विमानतळावर पोहोचले होते. या ठिकाणी उद्योग मंत्री सामंत जवळपास दहा ते पंधरा मिनिटे थांबलेले होते. परंतु, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई मुंबईला रवाना होणार असल्याने तसेच कोकणातील हवामान विमानाला उतरण्यासाठी अनुकूल नसल्यामुळे उद्योग मंत्री सामंत हे गाडीनेच कोकणात रवाना झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री देसाईंचे विमानतळावरच जेवण

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई विटा येथून सातारा येथील निवासस्थानी जाणार होते. त्यानंतर तेथून मुंबईतील पावनगड या शासकीय निवासस्थानी सायंकाळी सहा नंतर जाणार होते. परंतु, ते अचानक कऱ्हाड येथील विमानतळावरून विमानाने मुंबईकडे रवाना झाले. मंत्री देसाई यांनी विमानतळ येथेच दुपारचे जेवण घेतले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, कऱ्हाडचे पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विश्वजीत कदम यांची गाडी विमानतळावर

काँग्रेसचे नेते आणि कडेगाव- पलूस विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम हे कराड विमानतळावरून आज सकाळी शिर्डीला रवाना झाले होते. सायंकाळी 5 ते 5.30 वाजता माजी मंत्री कदम येणार असल्याने त्यांना नेण्यासाठी त्यांच्या दोन गाड्या कऱ्हाड विमानतळावरती आल्या होत्या. यावेळी आवर्जून शंभूराज देसाई यांनी या गाड्या कोणाच्या असे विचारतात, उपस्थितांनी विश्वजीत कदम यांच्या असल्याचे सांगितले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT