Uday Samant Vs Jitendra Awhad : 'आव्हाडांचं वक्तव्य केवळ प्रभू श्रीरामाचा अपमान नाही, तर...' ; उदय सामंतांचे टीकास्त्र!

Narayan Rane News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत नारायण राणे यांनी सुनावल्याबद्दलही उदय सामंतांनी दिली प्रतिक्रिया.
Uday Samant
Uday Samant Sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांसह सत्ताधारी भाजप, शिंद गट आणि अजित पवार गटाने आव्हाडांविरोधता आक्रमकम भूमिका घेतली आहे. शिवाय, राजकीय नेत्यांसह मंत्र्यांचीह प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना(शिंदे गट) मंत्री आणि रत्नागरिचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

'आव्हाड(Jitendra Awhad) यांनी केलेलं वक्तव्य हा फक्त श्री प्रभू रामचंद्रांचा अपमान नाही, तर भारतामधील प्रत्येक नागरिकाचा बंधू-भगिनींचा अपमान आहे. अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचे 22 तारखेला लोकार्पण होत असताना कुठेतरी जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी केलेले हे वक्तव्य आहे.' असा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uday Samant
Udayanraje Bhosale News : 'त्या' विकृत लोकांवर कडक कारवाई करा..!

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी उदय सामंत यांनी कोणतेही भाष्य करू नये या शब्दात उदय सामंत यांना सुनावलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले की, 'राणे यांनी केलेले वक्तव्य हे गैरसमजातून असेल त्यांचं वक्तव्य कशावरून आलं हे मला माहिती नाही. त्यांना प्रश्न विचारताना माझी मुलाखत पूर्ण दाखवलेली नसेल मी जे विधान केलं होतं त्या विधानावरती मी आजही ठाम आहे.'

'महाराष्ट्रातील आमदारकीचं अथवा खासदारकीचं तिकीट देण्याचे अधिकार शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची कोअर टीमला आणि अजित पवार व त्यांचे सहकारी राष्ट्रवादीचे तिकीट ठरवतील. यामध्ये राग येण्याचा काय प्रश्न आहे? जी वस्तुस्थिती आहे तीच मी सांगितली.' असं उदय सामंत(Uday Samant) म्हणाले.

Uday Samant
Uddhav Thackeray : '...तेव्हा आम्हाला 'मातोश्री'हून आव्हाडांना सांभाळून घ्या, असे फोन यायचे!'

' मी... मी किरण रवींद्र सामंत... रोकेगा कौन ?' हे व्हाट्सअप स्टेटस लाईन ठेवली होती यावरून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाबाबत कोणता पेच आहे का? असं विचारल्यावर उदय सामंत म्हणाले की 'रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोणताही पेच नाही. किरण सामंत यांनी स्टेटस बदललं नाही तर तुम्हाला बातमी कशी मिळणार? अस त्यांनी हसत विचार थेट उत्तर देणे टाळले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com