sarkarnama
sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

हरियाणामध्ये स्पर्धेदरम्यान करमाळ्याचा धावपटू बंडू वाघमोडेचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो

पंढरपूर : हरियाणा येथे धावण्याच्या स्पर्धेसाठी गेलेल्या करमाळा येथील बंडू वाघमोडे (वय २१) या तरूण धावपटूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. करमाळा श्री कमलादेवी स्पोर्टस् क्लबच्या वतीने तो स्पर्धेत सहभागी झाला होता. करमाळा तालुक्यातून दहा युवक या स्पर्धेला गेलेले आहेत. त्यापैंकी पहिल्याच दिवशीच बंडू वाघमोडे धावण्याच्या स्पर्धेत धावत असताना तो कोसळला व त्याचा मृत्यू झाला.

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात व्दित्तीय वर्षाला तो शिक्षण घेत होता. बंडूला (bandu waghmode) पोलिस खात्यात जाण्याची इच्छा होती. येथील दिनेश जाधव यांच्या श्री कमलादेवी स्पोर्टस् क्लबमध्ये तो सराव करत होता.

वाघमोडे परिवार मुळचा निलज येथील रहिवाशी आहेत. ते अलिकडे सुपनवर वस्तीवरती राहत आहेत. दत्तात्रय वाघमोडे हे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांना बंडू व नामदेव अशी दोन मुले व दोन मुली आहेत. नामदेव हा जेसीबी ऑपरेटर आहे. बंडूच्या मृत्यूनंतर सुपनवर वस्ती येथे शोककळा पसरली. एक पैलवान व धावपटू म्हणून नावारूपास येऊ लागलेला बंडू आकस्मात गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

बंडू वाघमोडे यांचा भाऊ नामदेव वाघमोडे, अशोक वाघमोडे, पोथऱ्याचे शिंदे व अकॅडमीचे संचालक दिनेश जाधव हे हरियाना येथे गेले. शवचिकित्सा झाल्यानंतर व सर्व कायदेशीर प्रक्रिया संपल्यावर काल (ता.21) बंडूचे पार्थिव घेऊन करमाळ्याकडे निघाले आहेत. आज सायंकाळपर्यंत करमाळ्यात येण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT