CM Shinde and CM Siddaramaiah Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Shinde: मुख्यमंत्री शिंदेंच्या विशेष अधिकाऱ्याचा कर्नाटक सरकारला इशारा; 'कानडी नागरिकांच्या...'

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आरोग्य योजनांना कर्नाटकच्या प्रशासनाकडून विरोध

Rahul Gadkar

Kolhapur News: महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांना लागू केलेल्या योजनेला विरोध केला, तर महाराष्ट्रातील कानडी लोकांसाठी लागू केलेल्या योजना देखील रद्द केल्या जातील, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आरोग्य योजनांना कर्नाटकच्या प्रशासनासह कन्नड संघटनांनी विरोध चालवला आहे. त्यामुळे शनिवारी महाराष्ट्राच्या आरोग्य योजनांसाठी सुरू केलेल्या सेवा केद्रांना कुलूप लावण्यात आले. त्याला मराठी भाषिकांत्त तीव्र विरोध होत आहे. तसेच माणुसकीच्या दृष्टिकोनातून कर्नाटक सरकारने आरोग्य योजनांना विरोध करू नये, अशी मागणी वाढू लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्नाटकने केंद्र बंद करण्याची सूचना करण्यात आल्यानंतर याबाबतची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्याचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी रविवारी शहर आणि परिसरातील कार्यकत्यांशी चंदगड येथे संवाद साधला. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारकडून कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, याची माहिती त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिली.

तसेच याबाबत महाराष्ट्रातील खासदार लवकरच याबाबत आवाज उठविणार असून, त्या संदर्भातील सूचना करण्यात आल्या आहेत. कर्नाटकाने आपल्या प्रशासनाला वेळीच सूचना देऊन येणाऱ्या काळात वाद वाढू नये, याची काळजी ध्यावी, अन्यथा महाराष्ट्र (Maharashtra) सरकार देखील महाराष्ट्रात राहणाऱ्या कानडी नागरिकांच्या योजना बंद करेल, असा इशारा चिवटे यांनी दिला.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT