Mangesh Sable News : ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली असता ३० दिवसांत आरक्षण देतो, जीआर काढतो अशी घोषणा केली होती. मात्र, ४० दिवस उलटले तरी काही झाले नाही.
त्यामुळे या राजकीय घोषणांवर, भाषणांवर आमचा आता विश्वास राहिलेला नाही. आम्हाला ठोस असे उत्तर हवे आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हवे आहे,'' असे विधान सरपंच मंगेश साबळे यांनी डोंबिवलीत त्यांच्या सत्कारानंतर केले.
तसेच ''मराठा समाज माजलाय असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याची हयगय केली जाणार नाही,'' असा इशारादेखील त्यांनी मराठा समाज आरक्षणास विरोध असणाऱ्यांना दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. नंतर या कार्यकर्त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे.
यानंतर छत्रपती संभाजी नगरमधील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांचा डोंबिवलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
या वेळी साबळे म्हणाले, ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते सर्व जातींमध्ये समभाव असला पाहिजे. इतर जाती, समाजाविषयी आपण वाईट बोलले नाही पाहिजे. परंतु त्यांचे नाव घेऊन काही व्यक्ती मराठा समाजाला डिवचण्याचे काम करत आहेत.
मराठा समाज हे कदापि सहन करणार नाही. मराठा समाज माजलाय असं जर कोणी म्हणत असेल तर त्याची हयगय केली जाणार नाही आणि त्याला उत्तर आम्ही सकाळच्या कृत्यातून दिले आहे.''
''सदावर्तेंना आम्ही काही इशारा देणार नाही. मात्र, समाजाच्या विरोधात जो बोलेल. समाजाला भडकवण्याचे काम करत असेल आणि त्याच्यामुळे समाजाला नुकसान होत असेल. समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मोडीत निघत असेल, तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागणार,'' असा इशाराही साबळेंनी दिला.
याशिवाय ''तरुणांनो आत्महत्या करू नका शांततेत लढा आम्हाला पाठिंबा द्या, फुकटात मरू नका. जन्म एकदाच भेटलेला आहे, त्याचे सार्थक करा. मराठा समाजासाठी तुमचे बलिदान हे उपयोगाचे ठरले पाहिजे. समाजासाठी झटत राहा, आम्ही आंदोलन करतो तसे करा; पण आत्महत्या करू नका,'' असे साबळे यांनी मराठा समाजातील तरुणांना आवाहन केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.