Pandharpur : कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होवू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये समिती सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
महायुतीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंढरपूरला कार्तिकी एकादशीला पूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना, की उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळणार यावरून नवा पेच निर्माण झाला आहे.
मराठा आरक्षण मागणीसाठी पुन्हा एकदा पंढरपुरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. कार्तिकी यात्रा नियोजनासाठी बोलावण्यात आलेली मंदिर समितीची बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न आंदोलकांना केला.येथील भक्त निवासामध्ये मंदिर समितीची बैठक सुरु असतानाच रामभाऊ गायकवाड यांच्यासह मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत बैठकीत शिरले. बैठकीत घोषणाबाजी सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाली.
दरवर्षी आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. यावेळी राज्याला प्रथमच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या रूपाने दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. यापैकी कोणाला शासकीय महापूजेचे निमंत्रण द्यायचे यावरून मंदिर समितीपुढे पेच निर्माण झालेला असतानाच मराठा क्रांती मोर्चाने कार्तिकी एकादशीची उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कार्तिकीची विठ्ठलाची महापूजेबाबत वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर मंदिर समितीने शासकीय महापूजेचे उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देवू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.
यापूर्वी 2018 मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रामभाऊ गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढीच्या शासकीय महापूजेला विरोध केला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला न येता शासकीय वर्षा निवासस्थानी विठ्ठलाची केली होती. त्यानंतर याच मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी उपमुख्यमंत्र्या हस्ते होणाऱ्या या महापूजेला विरोध केला आहे.
दरम्यान मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर विधी व न्याय खात्याला कळवण्यात येईल, सरकारकडून येणाऱ्या सुचनेनुसार निर्णय घेतला जाईल अशी स्पष्ट भूमिका मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्पष्ट केलं. सध्याचे आंदोलनाचे स्वरूप बघता वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ शकते, असे सूचक विधान औसेकर महाराजांनी केलं आहे मराठा आरक्षण आंदोलकांच्या विरोधानंतर कार्तिकीची महापूजा कोण करणार याकडेच वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.