Dhananjay Munde and Karuna Sharma Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

तर धनंजय मुंडे तुरूंगात असते! करूणा शर्मांनी सांगितलं कारण..

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा आता राजकीय मैदानात उतरत आहेत.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. आता त्या राजकीय इनिंग सुरू करीत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शक्ती कायदा लागू झाला असता तर धनंजय मुंडे तुरूंगात असते, असा दावाही त्यांनी केला आहे.

शक्ती कायद्यावरून करूणा शर्मा यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शक्ती कायदा लागू झाला असता तर धनंजय मुंडे आणि संजय राठोड दोघेही तुरुंगात असते, असा दावा त्यांनी केला.त्या म्हणाल्या की, शक्ती कायदा हा केवळ दिखाव्यासाठी आहे. शक्ती कायद्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र सरकारने काही काम केले असते तर सर्वांत आधी धनंजय मुंडेंना तुरुंगात टाकले असते. त्यानंतर संजय राठोड यांनाही तुरुंगात टाकले असते. या नेत्यांवर साधा एफआयआरही पोलिसांनी दाखल केला नाही.

करुणा शर्मा यांनी कोल्हापूर (Kolhapur) उत्तरची पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. येथून योग्य उमेदवार न मिळाल्यास स्वत: मैदानात उतरण्याची तयारीही त्यांना दाखवली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व निवडणुका लढवण्याचे शर्मा यांनी जाहीर केले आहे. या निवडणुकांमध्ये शिवशक्ती पक्षाचे उमेदवार मैदानात असतील. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून होणार आहे. तेथे पक्ष उमेदवार उभा करणार आहे. योग्य उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणक लढवण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.

शिवशक्ती या पक्षाच्या प्रसारासाठी करुणा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेरपासून मागील महिन्यात महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली होती. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन पक्षाची ध्येय धोरणे व आगामी काळातील वाटचाल याबाबत त्यांनी जाहीर घोषणा केली होती. मी काही करु शकणार नाही, असे वाटणाऱ्या पती धनंजय मुंडे यांचाच आमच्या नव्या पक्षाला पाठिंबा असून, त्यांना माझा अभिमान असल्याचा दावा त्यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT