अखेर ठरलं! करूणा शर्मांची राजकीय एंट्री कोल्हापूर उत्तरमधून

करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
Karuna Sharma and Dhananjay munde
Karuna Sharma and Dhananjay munde Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. आता त्यांनी त्यांचा पक्ष कोल्हापूर (Kolhapur) उत्तरची पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. येथून योग्य उमेदवार न मिळाल्यास स्वत: मैदानात उतरण्याची तयारीही त्यांना दाखवली आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व निवडणुका लढवण्याचे शर्मा यांनी जाहीर केले आहे. या निवडणुकांमध्ये शिवशक्ती पक्षाचे उमेदवार मैदानात असतील. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून होणार आहे. तेथे पक्ष उमेदवार उभा करणार आहे. योग्य उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणक लढवण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.

Karuna Sharma and Dhananjay munde
शाळा सोडून जुगार गुरुजींना पडला महागात अन् हाती पडल्या बेड्या!

याबाबत बोलताना करूणा शर्मा म्हणाल्या की, यापुढे जिथे पोटनिवडणूक असेल तिथे आमच्या पक्षाचा उमेदवार असेल. कोल्हापूरमध्ये दोन-तीन जणांशी आमची बोलणी सुरु आहेत. यात उत्तम कागले, अजय देढे या सामाजिक कार्यकर्त्यांसह इतर दोन राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या नावाची घोषणा नंतर करण्यात येईल.

Karuna Sharma and Dhananjay munde
अबब! विशाल फटेच्या खात्यावरून तब्बल 100 कोटी रुपयांचे व्यवहार

शिवशक्ती या पक्षाच्या प्रसारासाठी करुणा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेरपासून मागील महिन्यात महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली होती. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन पक्षाची ध्येय धोरणे व आगामी काळातील वाटचाल याबाबत त्यांनी जाहीर घोषणा केली होती. मी काही करु शकणार नाही, असे वाटणाऱ्या पती धनंजय मुंडे यांचाच आमच्या नव्या पक्षाला पाठिंबा असून, त्यांना माझा अभिमान असल्याचा दावा त्यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com