KCR Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

KCR In Solapur : केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह सोलापुरात दाखल; BRSच्या ४०० नेत्यांसाठी २१० खोल्या बुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे उद्या सरकोली येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह सोलापुरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत सर्व आमदार, खासदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४०० जण सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. सोलापुरातील विविध हॉटेलमध्ये सुमारे दोनशे दहा खोल्या बुक करण्यात आलेल्या आहेत. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचे सोलापुरात भव्य असे स्वागत केले. (KCR and his entire cabinet entered Solapur)

केसीआर हे आज सकाळी रस्तेमार्गाने सोलापूरकडे (solapur) रवाना झाले होते. केसीआर आणि त्यांच्या टीमने दुपारचे जेवण उमरगा येथे केले. त्या ठिकाणी त्यांचे स्थानिक पदाधिकारी आणि महिलांनी औक्षण करून स्वागत केले. उमरग्यातील पाहुणचार आटोपल्यानंतर केसीआर यांचा ताफा सोलापूरकडे रवाना झाला.

सोलापूर केसीआर आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ पाचच्या सुमारास पोचले. स्थानिक नेतेमंडळींडून केसीआर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. वाहनांचा मोठा ताफा, त्यावर फुलांची उधळण, स्वागतासाठी भला मोठा हार यातून केसीआर यांनी सोलापुरात बऱ्यापैकी शक्तीप्रदर्शन केले आहे. केसीआर यांच्या ताफ्यातील पाचशे वाहनांचे सोलापूरकरांना कौतुक होतं. त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या कडेने पदाधिकारी, कार्यकर्ते उभे होते.

तेलंगणातून आलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख केसीआर, त्यांचे मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांचा सोलापुरातील हॉटेल सूर्या, दीपगिरी, किनारा आणि बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे. राव यांच्यासोबत आलेल्या ४०० नेत्यांच्या मुक्कामासाठी तब्बल २१० खोल्या बुक करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे बालाजी सरोवर मुक्कामी असणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आतापासूनच नेतेमंडळींची रिघ लागली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्या (मंगळवारी ता. २७ जून) सकाळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे (Pandharpur) रवाना होणार आहेत. पंढरपुरात पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे उद्या सरकोली येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे केसीआर भविष्यात महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना धक्के देण्याच्या तयारीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT