Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निर्णय मी एकटा घेत नाही. पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येऊन अजित पवार यांच्या पक्षसंघटनेतील काम करण्याच्या इच्छेवर चर्चा करतील. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. (Regarding Ajit Pawar, a decision will be taken after discussion in organization : Sharad Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेतेपदावर आपल्याला काम करण्याची इच्छा नाही. संघटनेतील पद मला द्या, अशी मागणी केली होती. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना आपले मत नोंदविले आहे. पक्षाच्या संघटनेच्या कामात लक्ष द्यावं, अशी सर्वांची भावना आहे. अजित पवारांनी तेच मत व्यक्त केलेले आहे. त्यापेक्षा वेगळं काही नाही, असंही पवारांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात शरद पवारांना उद्देशून बोलताना १९७७ च्या पुलोद सरकार स्थापनेचा उल्लेख केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन शरद पवार हे बाहेर पडले होते. तत्कालीन जनसंघाच्या (आताचा भाजप) लोकांना बरोबर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं होतं. पुलोदचे ते सरकार सुमारे दोन वर्षं चाललं. पवारसाहेबांनी तेव्हा जे केलं, ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल? असा सवालही फडणवीस यांनी केला होता.
फडणवीसांच्या आरोपाला उत्तर उत्तर देताना पवार म्हणाले की, ‘मी कधी असं केलं, हे त्यांनी सांगावं. आम्ही १९७७ मध्ये सरकार बनवलं. पण, त्यावेळी माझ्यासोबत जनसंघाचे आमदार होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस वयाने लहान असतील, कदाचित ते प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे कदाचित त्यांना ते कळलं नसेल. पूर्वीचा इतिहास त्यांना माहिती नसेल. फडणवीस यांचं वाचन किती आहे, हेही मला माहिती नाही. पण, १९७७ मध्ये मी जे सरकार बनवले, ते सर्वांना घेऊन बनवले होते. असं वक्तव्य ते अज्ञानापोटी करत असतील. त्यावर यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही.
मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या मित्रपक्षांची बैठक घेतात, ते त्यांनं चालतं. आम्ही विरोधी पक्ष एकत्र आले की मात्र ते टीका करतात. प्रत्येकाला बैठक घेण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत या बैठकीत काहीही चर्चाच झालेली नाही. बेरोजगारी, महागाई आणि काही ठिकाणी जात्यांध समाजात तेढ निर्माण करु पाहत आहेत. त्यावरच चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितले. सामाजिक सलोखा असणे गरजेचे असल्याचे मत सर्वांनीच व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.