KCR Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

KCR Tour In Solapur : केसीआर अन॒ त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ उद्या सोलापूर मुक्कामी; तीन हॉटेल बुक, नव्या घोषणेची शक्यता

ते मंत्रिमंडळासह आषाढीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जाणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Solapur Politic's : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्याच्या अख्खा मंत्रिमंडळाचा दोन दिवसांचा सोलापूर (Solapur) दौरा निश्चित झाला असून ते उद्या (ता. २६) सोलापूरकडे रवाना होणार आहेत. उद्या संध्याकाळी त्यांचा सोलापुरात मुक्काम असून परवा ते मंत्रिमंडळासह आषाढीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जाणार आहेत. केसीआर यांच्या वतीने श्री विट्ठल मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजून त्यांना परवानगी मिळालेली नाही. (KCR and his entire cabinet will come to Solapur tomorrow)

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील सरकोली येथे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी २७ जून रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. याच मेळाव्यात भालके हे मुख्यमंत्री राव यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून (NCP) भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहेत. या वेळी केसीआर यांचे अख्खे मंत्रीमंडळ, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भालके यांनी शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री कार्यालयाचे दोन सचिव स्तरीय अधिकारी सोलापुरात दाखल झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली असून पंढरपुरात विठ्ठल मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी हेलिपॅडची परवानगी मागितली आहे. त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

केसीआर यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ सोमवारी (ता. २६) सोलापुरात मुक्कामी दाखल होणार आहे. मुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री, फक्षाचे खासदार व आमदार या प्रमाणे तीनशे लोकप्रतिनिधी शहरात दाखल होतील. बालाजी सरोवर, हॉटेल सूर्या, हॉटेल किनारा आदी ठिकाणी त्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनाची व्यवस्था भगीरथ भालके यांनी पाहिली आहे. विठ्ठलाच्या दर्शनानंतर सरकोलीत शेतकरी मेळाव्याला ते उपस्थिती लावणार आहेत. त्याच मेळाव्यात भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश होणार आहे. भालके यांच्याकडे भोजन घेणार आहेत. त्यानंतर ते तुळजापूरला तुळजा भवानी मातेचे दर्शन घेणार आहेत.

आता दूध खरेदी घोषणेची शक्यता

अबकी बार किसान सरकार अशी घोषणा महाराष्ट्रातील सभांमध्ये करणारे केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. आता तेलंगणाचे अख्खे मंत्रिमंडळ विठ्ठल दर्शनाला जाणार आहे. याापूर्वी केसीआर यांनी कांदा खरेदीची तयारी दाखवली. आता ते दूध खरेदीची घोषणा करण्याची शक्यता आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करण्याच्या दृष्टीने नियोजन केल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT