Annabhau Sathe, K. Chandrashekahr Rao Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

KCR In Maharashtra : अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देणारच; केसीआर यांची गर्जना

Annabhau Sathe Birth Anniversary : "मांतग समाजातील आमदार, खासदार करण्यासाठी प्रयत्न करणार"

सरकारनामा ब्यूरो

Sangali News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना रशियाने ओळखले, रशियाने त्यांचा सन्मान केला, मात्र भारत ओळखू शकला नाही. वंचित पीडित लोकांसाठी लिहणाऱ्या अण्णाभाऊ साठे याना भारतरत्न द्या, अशी मागणी करत त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील वाटेगावमध्ये येऊन मंगळवारी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी साठे कुटुंबातील सदस्यांची भेट ही त्यांनी घेतली. (Latest Political News)

के. चंद्रशेखर राव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामुळे वंचिताच जगणे समाजासमोर आणल्याचे सांगितले. त्यांना सन्मान देण्याने आपला सन्मान वाढणार आहे. त्यांना भारतरत्न देण्यासाठी तेलंगणा सरकारच्या वतीने शिफारस करणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही शिफारस करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भारत राष्ट्र समिती पत्र पाठवणार असल्याचे राव यांनी यावेळी स्पष्ट केले.

राव म्हणाले, "अण्णाभाऊ यांचे साहित्य इतर भाषामध्ये प्रकाशित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रयत्न करावेत. त्यांचे साहित्य जगात पोहचवले पाहिजे. राजकारणात मांतग समाजाला योग्य स्थान मिळेलले नाही. आपण भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून मांतग समाजातील आमदार, खासदार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे", अशी ग्वाहीही राव यांनी यावेळी दिली.

तेलंगणा सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत राष्ट्र समिती आग्रही आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीला साथ द्या, असे आवाहनही राव यांनी केले आहे. दरम्यान के. चंद्रशेखर राव यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. राव अण्णाभाऊ यांच्या स्नुषा सावित्री आणि नातू सचिन यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी मांतग समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT