Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon : जिल्हा तहानलेला ठेऊन विद्वान खासदार पाणी माढ्याला नेताहेत : रामराजेंची टीका

Umesh Bambare-Patil

Ramraje Naik Nimbalkar News : काही निरुद्योगी लोक विनाकारण सामाजिक वातावरण बिघडवत आहेत. ज्यांना पाणीप्रश्न माहिती नाही ते या विषयावर बोलू लागले, तर अवघड आहे. जिल्ह्याच्या बऱ्याच दुष्काळी भागाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोळशी धरण झाल्यास मिटणार आहे. त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र, विद्वान खासदार जिल्हा तहानलेला ठेऊन हे पाणी नीरा कालव्यातून माढ्याला नेण्याचा विचार करत आहेत, अशी टीका आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.

वाठार स्टेशन येथे माजी खासदार (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, बाळासाहेब सोळस्कर, सुभाष धुमाळ, मंगेश धुमाळ उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘‘लक्ष्मणतात्या कार्यकर्त्यांचे ऊर्जास्थान होते. माणूस कितीही मोठा झाला तरी मातीशी नाळ आणि सामाजिक बांधिलकी असली पाहिजे, तरच संघटना मजबूत होते. तात्यांच्या पाठीमागे त्यांची मुलंही त्याच विचारधारेने कार्यरत आहेत.

जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे, डॉ. सुयोग यांनी आयोजित केलेले शिबिर त्यांचा लेंभे कुटुंबाशी असलेला जिव्हाळा अधोरेखित करते. रामराजे म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात जॅकेट घालायची पद्धत आली आहे. जॅकेटखाली सगळा भ्रष्टाचार लपून जातो. यांचा नेताच जॅकेट घालतो, त्यामुळे बाकीचे तुम्हीच समजून जा''

मोर्चाचा इशारा...

रामराजे म्हणाले, ‘‘आपले सरकार नसल्याने आपली कामे अडवली जात आहेत. आजपर्यंत आपण कधी आंदोलन, मोर्चा या गोष्टी केल्या नाहीत; पण आता सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध आवाज उठवावा लागेल. पाच वर्षांत फलटणमधून ३०० ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले. काही जळाले आहेत. हे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. याविरोधात लवकरच मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT