Ranjitsingh Vs Ramraje : रामराजेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीसांकडून नकार : खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा गौप्यस्फोट

फडणवीस यांनी नकार दिल्यामुळे त्यांनी काल परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Ramraje Naik-Nimbalkar-Devendra Fadnavis-Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik-Nimbalkar-Devendra Fadnavis-Ranjitsinh Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

सातारा : ‘विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आम्हाला भारतीय जनता पक्षात (BJP) घ्या; म्हणून हेलपाटे मारत आहेत. पण, फडणवीस यांनी नकार दिल्यामुळे त्यांनी काल परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली,’ असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinha Naik Nimbalkar) यांनी केला. (Fadnavis rejects Ramraje's entry into BJP: MP Ranjitsinh Nimbalkar)

इंग्लंडचे पंतप्रधान आले तरी फलटणची जनता आम्हालाच मतदान करेल, असे विधान रामराजेंनी केले होते. त्यावर खासदार निंबाळकर बोलत होते. ते म्हणाले की इंग्लंडहून पंतप्रधान येण्याची गरज नाही. आमचे उपमुख्यमंत्री फडणवीसच रामराजेंना पुरसे आहेत. अनेक दिवस झाले रामराजे हे फडणवीसांकडे आम्हाला भाजपमध्ये घ्या; म्हणून हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्याला फडणवीस यांनी नकार दिला, त्यामुळेच बहुतेक रामराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी.

Ramraje Naik-Nimbalkar-Devendra Fadnavis-Ranjitsinh Naik Nimbalkar
Bawankule On Ajit Pawar : राष्ट्रवादीत अजित पवारांवर अन्याय : बावनकुळेंनी वात पेटवली

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच सभेतून घड्याळाचे चिन्ह, शरद पवारांचा फोटो गायब झाला होता. फलटणमध्ये असं अनेकवेळा होतं. त्यांना असं वाटलं की मला भाजपमध्ये अथवा शिवसेनेत घेतील, त्यावेळी ते चिन्ह गायब करतात, असाही आरोप निंबाळकरांनी केला.

Ramraje Naik-Nimbalkar-Devendra Fadnavis-Ranjitsinh Naik Nimbalkar
Solapur DCC Bank : मोहिते पाटील, सोपल, परिचारक, शिंदे बंधूंसह दिग्गजांना डीसीसीत ‘नो एन्ट्री’? चंद्रकांतदादांच्या काळातील ‘त्या’ कायद्याचा अडसर

खासदार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. नीरा देवघर प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर लोहमार्गासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा देत निधीची तरतूद केली. त्याच दिवशी फटलणच्या सत्र न्यायालयास मंजुरी दिली. ग्रामीण रुग्णालयाचा आराखडा तयार करायला लावला. तसेच, गडकरी यांनी हजारो कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी जाहीर केले.

Ramraje Naik-Nimbalkar-Devendra Fadnavis-Ranjitsinh Naik Nimbalkar
Sharad Pawar News: महाराष्ट्राच्या विकासातील पवारांचे योगदान उलगडणार पाच खंड : पहिल्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

रामराजे करू न शकणारी कामे महिन्याभरातच मार्गी लागत आहेत, हे पाहून रामराजेंच्या मानसिकतेवर थोडासा परिणाम झाला आहे. त्यांना मानसिक धक्का बसला. त्यातूनच त्यांनी रेल्वे चालू नाही, असे सांगितले. पण, आमच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेचा व्हिडिओ व्हायरला केला. आमच्या कामाचा वेग वाढला, त्यांना लोक प्रश्न विचारू लागले आहेत. त्यातून ते मानसिक तणावाखाली गेल्याचे मला जाणवले आणि त्यामुळे जी कामे झाली आहेत, त्याचे सर्व श्रेय रामराजेंना मी फलटणमध्ये जाऊन जाहीर केले, असा टोलाही निंबाळकरांनी रामराजेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com