Khandala Andolan
Khandala Andolan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khadala : आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आव्हाडांच्या प्रतिमेचे खंडाळ्यात दहन

अश्पाक पटेल

Khandala News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आज येथील प्रशासकीय कार्यालयासमोर बाळासाहेबांची शिवसेना Shivsena व भाजप BJP कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीचे NCP नेते जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करुन निषेध नोंदवला.

यावेळी बाळसाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, अनुप सुर्यवंशी, चंद्रकांत यादव, भुषण शिंदे, प्रदीप माने, अभिजीत गायकवाड, यशराज भोसले, अतुल पवार, धनाजी डेरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे प्रशासकीय इमारत समोर सकाळी एकत्रित आले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्य वक्तव्याबद्दल निषेध नोंदवत घोषणाबाजी केली.तसेच त्याची प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करुन निषेध व्यक्त केला.

दरम्यान,याबाबत पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांना भाजप युवा मोर्चाकडुन निवेदन देण्यात आले. जितेंद्र आव्हाड वांरवार धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT