Anil babar, Suhas Babar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : अनिल बाबरांचा वारसा सुहासकडे, राज्य नेतृत्व देणार पोटनिवडणुकीतून चाल

Anil Kadam

Khanapur Atpadi Vidhan Sabha Constituency Politics :

खानापूर, आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले. निधन होऊन एक महिनाही झाला नाही, अशातच लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाने लोकसभेबरोबर खानापूरची पोटनिवडणूक घेण्याची तयारी सुरू केली आहे. पोटनिवडणुकीत अनिल बाबर यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांना पुढे चाल मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यांना जर संधी मिळाली तर राज्याला भविष्यात एक तरुण नेता मिळेल, असे चित्र आहे

राज्याच्या राजकारणात अनिल बाबर यांचे मोठे नाव होते. गतवर्षी ज्यावेळी राजकीय भूकंप झाला. Eknath Shinde यांनी शिवसेनेत बंड केला, त्यावेळी सर्वात अगोदर त्यांना साथ दिली ती अनिल बाबर यांनी. गुवाहाटीच्या दौऱ्यात अनिल बाबरही होते. मंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेल्या अनिल बाबर यांना शेवटपर्यंत काही संधी मिळाली नाही. एक पाणीदार आमदार म्हणून त्यांनी आपली सर्वत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या अचानक निधनाने आता पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.

Anil Babar यांचे कनिष्ठ पुत्र सुहास बाबर यांनी आपल्या वडिलांच्या प्रत्येक निवडणुकीत तळागाळात जाऊन काम केले आहे. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असताना त्यांना काम करण्याची मोठी संधी मिळाली. मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते आहेत.

आटपाडीच्या तानाजी पाटलांचीही त्यांना मोठी साथ आहे. अनिल बाबर यांच्या कामाचा आणि विचारांचा वारसा ते समर्थपणे पुढे चालवू शकतात, यात काही शंका नाही. सध्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्रअण्णा देशमुख, अजितदादा पवार गटात वैभव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अॅड. बाबासाहेब मुळीक आदी नेते कार्यरत आहेत.

अनिल बाबर पहिल्यांदा 1990 मध्ये विधानसभेसाठी निवडून आले. 1995 मध्ये आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. पुढे 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. अनिल बाबर राष्ट्रवादीमधून निवडून आले. पुढे 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि निवडून आले. 2019 मध्येही ते शिवसेनेतून निवडून आले.

सध्याच्या घडीला महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमुळे या मतदारसंघात बाबर यांना कोणतीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही सुहास बाबर यांना पुढे चाल देण्यासाठी एक पाऊल पुढे येतील यात काही शंका नाही.

जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत ज्या ज्या पोटनिवडणुका झाल्या, त्यामध्ये सांगलीचा एक अपवाद सोडला तर कुटुंबातील व्यक्तीलाच संधी मिळाली आहे. लोकांनीही त्यांना भरभरून साथ दिली आहे. 1987 मध्ये सांगलीच्या वसंतदादा पाटील यांची राज्यस्थानच्या राज्यपालपदी निवड झाली. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लागली. येथे वसंतदादांचे पुतणे विष्णूअण्णा यांना तिकीट मिळाले. परंतु नवख्या असणाऱ्या पै. संभाजी पवारांनी त्यांना चितपट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

1095 मध्ये पलूस कडेगाव मतदारसंघातून डॉ. पतंगराव कदम यांचा पराभव करणाऱ्या संपतराव देशमुख यांचेही निधन झाले. येथेही पोटनिवडणूक लागली होती. येथेही मतदारांनी देशमुख कुटुंबीयातील पृथ्वीराज देशमुख यांना आमदार केले.

पलूस कडेगाव मतदारसंघात डॉ. पतंगराव कदम यांचेही आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मतदारांनी विश्वजित कदम यांना बिनविरोध निवडून दिले. त्यावेळी कडेगावच्या देशमुख कुटंबीयांनीही मोठे मन दाखवून निवडणुकीत माघार घेतली आणि विश्वजित कदम यांना साथ दिली. तासगाव मतदारसंघातही आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनाही मतदारांनी भरभरून साथ दिली. 2014 आणि 2019 असे दोन वेळा त्या निवडून आल्या.

आता लोकसभेबरोबर खानापूर आटपाडी मतदारसंघाचीही पोटनिवडणूक लागणार आहे. बाबर कुटुंबीय अजून दुःखातून सावरले नाहीत, परंतु बाबर यांचे विचार आणि त्यांचे काम त्यांच्या कुटुंबीयांना पुढे चालवावे लागणार आहे. त्यामुळे सुहास बाबरही तयारीत आहेत. सध्याच्या सरकारची मुदत ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. नवीन आमदाराला सहा महिने कालावधी मिळणार आहे. एकंदरीत निवडणूक लागली तर कदाचित सुहास बाबर बिनविरोध होण्याचे संकेत मिळत आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT