Ramdas Athawale : आठवलेंच्या 'आरपीआय'ची खंत; भाजपसोबत राजकीय फायदा नाहीच...

Republican Party Of India : मिरजमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) कार्यकर्ता मेळावा पार पडला.
Republican Party Of India
Republican Party Of IndiaSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News: भाजपसोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आले, पण राजकीय फायदा मिळवण्यात अपयश आल्याची खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केली. यापुढे कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असंही ते म्हणाले. मिरज येथे आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात वाघमारे बोलत होते.

ज्यांना धर्मनिरपेक्ष समजले, त्या काँग्रेस पक्षाने नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवले. ज्यांना आम्ही जातीयवादी म्हणत आलो. त्याच भाजपने मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिला. कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर 'आरपीआय'चे केडर तयार केले पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Republican Party Of India
Deepak Kesarkar : आणखी एक बडा नेता भाजपत प्रवेश करणार ? केसरकरांनी सूचक विधान करत फोडला राजकीय बॉम्ब

कार्याध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले जो निर्णय घेतात. तो आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक असतो. आगामी निवडणुकांसाठी आरपीआय पूर्णपणे सज्ज असून, निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात उमेदवारी मागितली जाईल. सत्तेतील पदासोबत विविध शासकीय कमिट्यांमध्येसुद्धा कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिला जाईल. कार्यकर्त्यांनी स्वाभिमानाने पक्ष वाढवावा. मित्र पक्षाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःची ताकद निर्माण करा, मग त्यानंतर सत्तेत कोण पण असू दे. स्वतःहून तुमच्याकडे येतील, असं ते म्हणाले.

आगामी निवडणुकीत लोकसभेसाठी 'आरपीआय'ने सोलापूर हा मतदारसंघ मागितला आहे. त्याचप्रमाणे विधानसभेसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मिरज मतदारसंघावर आमचा दावा आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगितले.

सत्ता बदलली असली तरीसुद्धा व्यवस्था बदलली नाही. केंद्र किंवा राज्य सरकार हे चांगल्या योजना तयार करतात. मात्र, अधिकारी लाभार्थ्यांची अडवणूक करतात. अशीच परिस्थिती राहिली तर आरपीआय कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पँथरची चळवळ उभारावी लागेल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, या मेळाव्यास उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सचिव जगन्नाथ ठोकळे, सहसचिव संजय कांबळे, जितेंद्र बनसोडे, अशोक कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, मिलिंद मेटकरी, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, डॉ. रविकुमार गवई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Republican Party Of India
CM Shinde Sangli Tour : जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री उतरणार; शिवसेनेकडून जोरदार तयारी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com