Anil Babar-Suhash Babar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khanapur-Atpadi By Election : लोकसभेबरोबर होणार खानापूरची पोटनिवडणूक; सुहास बाबरांना उमेदवारीचे संकेत

Election Commission News : आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तत्काळ माहिती मागवली आहे.

Anil Kadam

Sangli News : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तत्काळ माहिती मागवली आहेे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे, त्यासोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये बाबर यांचे चिरंजीव सुहास यांना महायुतीकडून संधी मिळण्याचे संकेत आहेत. (Sangli Political News)

खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार अनिल बाबर यांचे 31 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या रिक्त जागी निवडणूक होणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून खानापूर-आटपाडी पोटनिवडणुकीबाबतची माहिती सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारसंघ रचना, मतदार संख्या, केंद्र तसेच आवश्यक असणारी मतदान यंत्रं याबाबतची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक विभागाला माहिती सादर केली आहे. (Byelection)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोटनिवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रेही सोलापूर येथून मागविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभेसोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभेबरोबर पोटनिवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. (Mahayuti Vs Mahavikas Aghadi)

दरम्यान, खानापूर-आटपाडीत 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत (स्व.) अनिल बाबर यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे नेते व माजी आमदार सदाशिव पाटील यांनी बाबर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, बाबर यांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेच्या चिन्हावर तब्बल 27 हजार मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. टेंभूसह सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी झटणारे आमदार बाबर यांचे 31 जानेवारीला निधन झाले.

सुहास बाबर यांना मिळणार संधी

(स्व.) आमदार अनिल बाबर यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याने बाबर कुटुंबाला संधी मिळण्याची शक्यता आहे. सुहास बाबर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. बाबर यांच्या राजकीय वाटचालीत सुहास हे अग्रेसर होते. त्यांचा मतदारसंघात जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत महायुतीकडून सुहास यांना संधी मिळण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT