Kiran Lohar
Kiran Lohar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kiran Lohar News : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे सापडलं घबाड; आकडा वाचून थक्क व्हाल...

सरकारनामा ब्युरो

Kiran Lohar News Update : प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार (Kiran Lohar) यांना 31 ऑक्टोबर रोजी 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत विभागाने सापळा रचून लोहार आणि त्यांच्या साथीदाराला ताब्यात घेतले. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत आले होते.

दरम्यान, या लाचखोर किरण लोहार यांनी शिक्षण खात्यात आजपर्यंत केलेल्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. सेवेत असताना त्यांनी जमवलेल्या धनाचा आकडा सांगितल्यास तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही. लोहार यांनी गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 50 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याची माहिती समोर आली आहे. चुकीच्या मार्गाने ही संपत्ती म मिळवल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर 'अपसंपदा' अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

13 महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत बदली झाली होती. 31 ऑक्टोबर रोजी 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, तसेच पुढील आदेश होईपर्यंत ते निलंबित राहतील, असेही जाहीर केले होती. किरण लोहार यांनी रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापुरात शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या तीनही ठिकाणी ते वाद्‌ग्रस्त राहिले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेतही लोहार यांची कार्यशैली वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच लोहार यांनी पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केला होता. त्यानंतर जिल्हापरिषदेने लोहार यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव केला.

इतकेच नव्हे तर लोहार जिल्हा परिषदेतील कार्यशैलीसोबतच त्यांची पीएच.डी सुद्धा चांगलीच चर्चेत होती. एका खासगी विद्यापीठाने पीएच.डी दिल्यानंतर त्यांनी एकप्रकारे फर्मान काढत गावभर फलक लावण्यासाठी सांगितले होते. लोहार यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या नावाच्या विद्यापीठाकडून ऑनररी पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली होती. पण ही संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत समोर आले होते. धक्कादायक म्हणजे टोंगा या देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतंही विद्यापीठ नसल्याचं सांगितलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT