सोलापूरचा लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर निलंबित

प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार (Kiran Lohar) यांना 31 ऑक्टोबर रोजी 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
Kiran Lohar
Kiran LoharSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार (Kiran Lohar) यांना 31 ऑक्टोबर रोजी 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडून अहवाल प्राप्त होताच तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, आयुक्त शिक्षण विभाग (Education Department) पुणे व संचालक शिक्षण विभाग पुणे या कार्यालयांना लोहार यांच्यावर कारवाईसाठी अहवाल पाठवला होता.

Kiran Lohar
मुख्यमंत्री शिंदेंचा सत्तारांना जाहीर सभेत माफी मागण्याचा आदेश?

त्यानुसार राज्य शासनाकडून 7 नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आदेशानुसार लोहार यांना निलंबित केले आहे. निलंबन आदेशानुसार किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (गट-अ), जि. प. सोलापूर (Solapur) यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे, असे म्हटले आहे. तसेच पुढील आदेश होईपर्यंत ते निलंबित राहतील.

त्याचप्रमाणे निलंबन कालावधीत लोहार यांचे मुख्यालय सोलापूर ठेवण्यात आले आहे. त्यांना या कालावधीत मुख्यालय सोडता येणार नाही, असेही निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. किरण लोहार यांनी रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापुरात शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या तीनही ठिकाणी ते वाद्‌ग्रस्त राहिले आहेत.

Kiran Lohar
अखेर सत्तारांनी जाहीर सभेत 'त्या' वक्तव्यावर केली दिलगिरी व्यक्त!

सोलापुरात पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. लोहार हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूरमधील शिक्षक कॉलनीमध्ये त्यांचे घर आहे. त्या घराची कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com