kirit Somayya sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचे आता मिशन जरंडेश्वर कारखाना..

मी मुंबई विद्यापीठातून फायनान्स मधून पीएचडी केलेली आहे. चॉर्टर्ड अकौंटंट मध्ये ऑल इंडिया गोल्डमेडेलिस्ट आहे. शरद पवार या पॉवर फुल परिवाराने शिकण्यासाठी मला हा वेगळा विषय दिला आहे.

Umesh Bambare-Patil

सातारा : जरंडेश्वर कारखाना कवडीमोल भावाने विकण्यात आला आहे. आता या कारखान्याच्या शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या पाच ऑक्टोबरला मी जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहे. त्यानंतर बारामतीला जाणार असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजपचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे जाताना आज पहाटे सातारा शासकिय विश्रामगृहात थांबले होते. सकाळी सात वाजता त्यांची जरंडेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी श्री. सोमय्या यांनी त्यांच्याशी चर्चा करून येत्या पाच ऑक्टोबरला जरंडेश्वर कारखान्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जरंडेश्वर कारखान्याची मुळ संस्थेचे उपाध्यक्ष व संचालक भेटायला आले आहेत. प्रत्यक्ष काय झाले जनता, अजानता शेतकऱ्यांची जमिन दाखवून कारखाने उभे केले. कालांतरने ही सर्व मालमत्ता राजकिय नेत्यांची स्वतः इस्टेट व्हायला लागली. काही कारखाने अडचणीत होते, ते कोणीतरी चालविण्यास घेतले. काही ठिकाणी घोटाळे झालेले आहेत. तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही माझी भुमिका आहे. पारनेर कारखान्याची १५० एकर जमीन पडून आहे. ही कारखान्याला १२५ एकर जमिनी दिली होती आणि आता १५० एकर जमिन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरंडेश्वरचा प्राथमिक अहवालात ६५ कोटीला बेनामीपणे विकत घेण्यात आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मी येत्या पाच ऑक्टोबरला जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहे. त्यानंतर बारामतीला जाणार आहे, असे श्री. सोमय्या यांनी सांगितले.

मी मुंबई विद्यापीठातून फायनान्स मधून पीएचडी केलेली आहे. चॉर्टर्ड अकौंटंट मध्ये ऑल इंडिया गोल्डमेडेलिस्ट आहे. शरद पवार या पॉवर फुल परिवाराने शिकण्यासाठी मला हा वेगळा विषय दिला आहे. मोड ऑफ ऑपरेशन सगळीकडे सेम आहे. हसन मुश्रीफ असो की अजित पवार असो, शरद पवार असो की पारनेर असो...राष्ट्रवादीच्या नेत्याने कारखाना घेतला. त्याचे अंडर व्हॅल्यूएशन करण्यात आले. सर्व ठिकाणी पॉवर फुल पवार परिवाराने दोन चार चांगले व्हॅल्युअर संभाळले आहेत. ते या संस्थांचे डिव्हॅल्युएशन करत आहेत. या सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मंत्री ईडीवरून गायब होतात, अनिल परब मध्ये हिंमत नाही, ईडीकडे गेले तर त्यांचे सगळे घोटाळे बाहेर येणार आहेत. श्री. परब यांनी तुमच्यावर शंभर कोटींचा दावा लावला आहे, या विषयी विचारले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी मिळून परब यांच्या माध्यमातून शंभर कोटींचा दावा माझ्यावर दाखल केला आहे. त्यांना शंभर कोटीच्या आकड्याचा मोह आहे, वसुली शंभर कोटींची आणि दावा शंभर कोटींचा त्यांना शंभर कोटींचा मोहच आवरत नाही, अशी टीका ही सोमय्या यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT