Madan Bhosale News, Makrand Patil News, Kisan veer sakhar karkhana election 2022 Result News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

किसन वीर निवडणूक : पहिल्या फेरीत मकरंद पाटलांच्या पॅनेलची आघाडी...

आमदार मकरंद पाटील MLA Makrand Patil यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर Kisan vir बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले Madan Bhosale यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली.

Umesh Bambare-Patil

सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी आमदार मदन भोसले यांच्या पॅनेलचे उमेदवार तीन ते चार हजार मतांच्या फरकाने मागे आहेत. (Kisan veer sakhar karkhana election 2022 Result News)

किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६९ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. आज वाई एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणी सुरू आहे. एकुण १५४ मतदान केंद्रांपैकी ७७ मतदान केंद्रांची मतमोजणी सध्या सुरू आहे.

गट क्र.३ वाई - बावधन - जावली गटात एकूण मते १८१७७, बाद २४९, वैध मते १७९२८. शेतकरी विकास पॅनेल- सचिन आप्पासाहेब भोसले ७००१, चंद्रसेन सुरेशराव शिंदे ६७०८, विश्वास रामराव पा़डळे ६८०८. किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल शशिकांत मदनराव पिसाळ १०७५७, दिलीप आनंदराव पिसाळ १०९०७, हिंदुराव आनंदराव तरडे १०५१२ (बावधन).

सातारा गट क्र. ४ पहिली फेरी एकुण मतदान १११६६, बाद मते २४५, वैध मते १७२१२, किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनल - संदीप प्रल्हाद चव्हाण १०८६९, सचिन हंबीरराव जाधव १०८१६,बाबासाहेब शिवाजी कदम १०७३५. शेतकरी विकास पॅनेल चंद्रकांत बजरंग इंगवले ६८४७, भुजंगराव जिजाबा जाधव ६९८३,अनिल पांडुरंग वाघमळे ६५९०, अपक्ष नवनाथ रघुनाथ साबळे ६१.

कोरेगाव गट क्र ५ एकूण मते १८१७९, बाद मते ३४५, किसन वीर कारखाना बचाव पॅनेल ललित जोतीराम मुळीक १०५८४, संजय अरविंद फाळके १०५७९, सचिन घनश्याम साळुखे १०७१९, शेतकरी विकास पॅनेल शिवाजी रामदास पवार ६७५२, मेघराज सुरेश भोईटे ६९५०,नवनाथ निवृत्ती केंजळे ६७५४, अपक्ष - दिलीप उध्दव जाधव ६२, रमेश दगडू माने ३९.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT