Suresh Kisan veer
Suresh Kisan veer  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

किसन वीर यांचे सुपुत्र सुरेश वीर यांचे अल्प आजाराने निधन

सरकारनामा ब्युरो

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश (आण्णा) किसन वीर (वय ८२) (Suresh Kisan Veer) यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किसन वीर हे त्यांचे वडील होते. किसनवीरांचा विधायक वारसा ते चालवत होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वाई येथील कवठे या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे.

https://youtu.be/7eYJTXS8FpEhttps://youtu.be/7eYJTXS8FpEसुरेश वीर यांच्यावर साताऱ्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी अतिशय उल्लेखनीय, आदर्शवत व शिस्तबद्ध काम करून दोन्ही संस्थांचा लौकिक वाढविण्यात त्यांचा मोलाचा मोठा वाटा होता.

सुरेश वीर कोण होते ?

ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किसन वीर यांचे पुत्र सुरेश वीर.

किसन वीर कारखान्याचे माजी अध्यक्ष

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष

दिवंगत आमदार विलास काका उंडाळकर यांचे निकटवर्तीय

साताऱ्यातलं सहकार क्षेत्रात मोठ्या कामासाठी सुरेश वीर ओळखले जायचे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT