शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी- जानव्याचे नाही

माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकारांचा नातू असणे हे माझं भाग्यच आहे.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

मुंबई: ‘देश हाच खरा धर्म आहे. अशी शिकवण प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thakare) यांनी दिली आहे. प्रबोधनकारांचे हिंदुत्व (Hinduttva) हे केवळ शेंडी, जानवे आणि घंटा वाजवण्यापुरते नव्हते. धर्माच्या नावाने सुरू असलेल्या ढोंगाला प्रबोधनकारांनीच लाथा घातल्या. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांचे नाव न घेता टोला लगावला. तसेच, आज प्रबोधकांरांच्या याच विचारांची गरज आहे आणि मी त्यांचा नातू म्हणून तसा प्रयत्न करतोय, असेही त्यांनी म्हटले.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन या मासिकातील लेखांचा संग्रह असलेले तीन खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रबोधकारांच्या आठवणी उलगडल्या.

CM Uddhav Thackeray
नवघरेंकडून विटंबनाच; हिंगोलीत शिवरायांचा जलाभिषेक होणारच

- प्रबोधनकारांचा नातू असणे हे माझं भाग्यच

''माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकारांचा नातू असणे हे माझं भाग्यच आहे. आम्ही आमच्या लहानपणी आजोबांकडून राजा-राणीच्या गोष्टी ऐकल्या नाही, तर त्यांच्या विचारांच्या गोष्टी ऐकल्या, मी काही फार त्यांच्या विचारांचा अभ्यास केला नाही पण त्यांच्या सहवासात वाढलो, शिकलो. प्रबोधनकार किती कडक शिस्तीचे होते ते आम्हाला बाळासाहेबांनीच सांगितलं." त्यामुळे प्रबोधनकारांचे ग्रंथ साहित्य देशात सर्व राज्यात पोहचवावे त्यासाठी त्याचे भाषांतर झाले पाहिजे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- याद राखा, ‘मी सुद्धा एक कडवट हिंदू आहे

आपण पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येतो. पण देश हाच धर्म. पण कुणी समोरून स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचाराने आला तर, याद राखा, मीदेखील एक कडवट हिंदू आहे. असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. तसेच, लोकशाहीत मत महत्त्वाचे असले तरी त्यासाठी पण हिंमत लागते. सध्या मी तशी हिंमत करीत आहेत. शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी- जानव्याचे हिंदुत्व नाही. पण सध्या राज्यात नवहिंदू नावाने जे काही सुरू आहे, ते सर्व प्रकार फार घातक आहेत. सध्या हिंदुत्व म्हणजे हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीसारखे झाले आहे. असा टोलाही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com