Rajesh Kshirsagar Attacks ON Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News: क्षीरसागरांचा सतेज पाटलांवर कडवा प्रहार! महायुती नेते व महापालिका अधिकाऱ्यांवरील टीका उत्तरच्या आमदारांच्या जिव्हारी

Kolhapur News: पालकमंत्रीपद, महापालिकेत सत्ता उपभोगताना पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे दिसले नाही काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: दिवाळी अभ्यंगस्नानाची स्वप्ने दाखवून कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले आहे. पालकमंत्रीपद, महापालिकेत सत्ता उपभोगताना पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे दिसले नाही काय? कुचकामी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असा सवाल उपस्थित करत थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता? असा प्रतिसवाल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना केला.

सन २०१२ मध्ये योजनेस तांत्रिक मान्यता देण्यात आली, डिसेंबर २०१३ मध्ये प्रशासकीय मान्यता होवून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. त्यावेळी आमदार सतेज पाटील पालकमंत्री होतेच यासह महानगरपालिकेत त्यांच्याच काँग्रेस पक्षाची सत्ता होती. ही योजना तब्बल १० वर्षांनी कार्यन्वित झाली. दिवाळीचे अभ्यंगस्थान योजनेच्या पाण्याने करून श्रेय घेण्यात आमदार सतेज पाटील सर्वात आघाडीवर होते. पण त्यानंतर पाईपलाईनला वारंवार लागणारी गळती, यंत्रणा बंद पडण्याच्या घटनांबाबत अबोला धरला होता. त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी या योजनेत सुमारे ७० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता.

याबाबतही आमदार पाटील यांनी मौन बाळगले आहे. गळकी थेटपाईपलाईन योजना जनतेच्या माथी मारण्याचे काम करणारे आमदार सतेज पाटील योजनेचे अपयश लपविण्यासाठीच जनतेत दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत. शहरातील वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. ही वितरण व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी त्यांनी महापालिकेत सत्तेत असताना, पालकमंत्रीपद असताना का घेतली नाही. स्वत: केलेले पाप महापालिका प्रशासनाच्या माथी मारण्याचे काम आमदार पाटील करत आहेत. योजनेचे डिझाईन, काम सन २०४५ची लोकसंख्या गृहीत धरून करण्यात आले. काम करणारी ठेकेदार कंपनी, सल्लागार कंपनी आमदार सतेज पाटील सत्तेत असतानाच नेमण्यात आली होती. काम योग्य पद्धतीने होते की नाही हे तपासण्याची पण त्यांची तितकीच जबाबदारी होती. पण हीच जबाबदारी पार पाडता न आल्याने आमदार पाटील जनतेची दिशाभूल करत आहेत.

जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जर एखादी यंत्रणा सुधारायचीच असेल तर त्याचा सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आम्ही महायुतीचे सर्वच आमदार प्रशासनावर वचक ठेवून जनतेची कामे करून घेत असल्यानेच माजी पालकमंत्र्यांना त्यांचा अकार्यक्षमपणा जाणवत असल्याने त्यांना आम्ही करण्याऱ्या कामाचे पोटशूळ उठले असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT