
Kolhapur News: मतदार यादीतील घोळाबाबत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ही मतदार यादी अपडेट करावी अशी सूचना केली. दिवसेंदिवस राज्यभरातून मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. अशातच कागल विधानसभा मतदारसंघात देखील मतदार यादीत घोळ असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीतसिंह घाटगे यांनी केला आहे. कागल शहरातील मतदार यादीत घोळ असल्याचं त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. हा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ करतात.
या संदर्भात समरजीतसिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन कागल नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि यादी दुरुस्त करणारे बीएलओ (BLO) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कागल नगर परिषदेच्या प्रभाग क्र. 10 मधील प्रारूप मतदार यादीमधील 342 मतदान गायब झालेलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. कागल शहरामध्ये एकूण 28,413 मतदान आहे. त्यांपैकी पुरुष मतदार 13,864 इतके, 14,548 इतके स्त्री व इतर 1 मतदार आहेत. त्यापैकी 822 नावे दुबार मतदारयादीत आहेत.
कागल शहरात सर्व प्रभागामध्ये मयत मतदार 458 आहेत. तर प्रभाग क्र 9 मध्ये घर नं 171 वर 36 मतदार नोंद असल्याचे दिसते. मग BLO यांनी एकाच घरावर इतकी नावे कशी नोंद केली. बूथ 34 व 35 मध्ये एकूण 106 मतदान वाढ झाल्याचे दिसून येते. प्रभाग क्र. 11 हा 3 उमेदवारांचा आहे. त्या प्रभागाचे मतदान 2,388 इतके आहे. तसेच प्रभाग 9 हा 2 उमेदवारांचा आहे. त्या प्रभागाचे मतदान 3,792 इतके आहे. प्रभागाच्या लोकसंखेत इतकी तफावत का?
प्रभाग क्र 2 मध्ये मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये पान नं 124 मध्ये अक्र 2495, 2498, 2500 व 2503 या चार अनुक्रमांकावर एकच व्यक्तीचे नाव मतदार यादी मध्ये आहे. व्यक्ती एकच असून त्याचे मतदान ओळखपत्र क्रमांक वेग-वेगळे आहेत, असे मुद्दे घाटगे यांनी उपस्थित केले. यासंदर्भात तक्रार करूनही नगरपरिषद स्तरावर कोणतीही दात घेतली जात नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून नगर परिषदेचे CEO आणि BLO यांच्यावर कारवाई करावी अन्यथा न्यायालयात जाऊन या अधिकाऱ्यांच्या विरोधात न्याय मागणार असल्याची भूमिका घाटगे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.