AAP and Rajarshi Shahu Aghadi candidates in Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

AAP Kolhapur candidates : 'मी निवडून आल्यानंतर टक्केवारी घेणार नाही, दुसऱ्या पक्षात जाणार नाही...'; 500 रुपयांच्या स्टॅम्पवर 'या' उमेदवारांकडून मतदारांना लेखी हमी!

Kolhapur AAP Candidates Anti-Corruption Affidavit : कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी मतदारांसमोर अनोखं शपथपत्र घेऊन महानगरपालिका निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही, मतदारांसाठी 24 तास उपलब्ध असेल. निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं 500 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 10 Jan : राज्यात महायुती सरकार आल्यानंतर निवडणुकीच्या निकालानंतर विरोधातील अनेक उमेदवार महायुतीमध्ये येण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मतदारांच्या विश्वासाला तडा देण्याचे काम अनेक उमेदवारांनी केल्याचं दिसून आलं.

मात्र त्याला छेद देण्यासाठी कोल्हापुरात आम आदमी पक्षाकडून गांधीगिरी पद्धतीने उमेदवारांकडून वचननामा घेण्यात आला आहे. निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही. असे शपथपत्र 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून घेण्यात आले आहे.

कोल्हापुरात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरात आम आदमी पार्टी आणि राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांना अनोखं शपथपत्र लिहून दिलं आहे. राज्यभरात महापालिका निवडणुकांची लगबग असल्याने मतदारांना प्रभावित करण्यासाठी उमेदवार आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत.

मात्र कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी मतदारांसमोर अनोखं शपथपत्र घेऊन महानगरपालिका निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही, मतदारांसाठी 24 तास उपलब्ध असेल. निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं 500 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिले आहे. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी भावी नगरसेवकांनी दिलेलं हे शपथपत्र कोल्हापूरात चर्चेचा विषय ठरत आहे.

शपथपत्रामधील प्रमुख मुद्दे

१) माझा कोणत्याही प्रकारचा अवैध (दोन नंबर) धंदा नाही.

२) मी कुठलेही ही गुंडगीरी, दरोडखोरी, दादागीरी अशी कृत्य आज पर्यंत केलेले नाही व पुढेही करणार नाही.

३) मी निवडून आल्यानंतर कुठल्याही टेंडरमध्ये टक्केवारी घेणार नाही. कोणत्याही कामात एक रुपयाचाही भ्रष्टाचार करणार नाही.

४) मी निवडून आल्यानंतर महापलिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही. चुकीच्या कामासाठी त्यांच्यावर दबाव टाकणार नाही

५) मी निवडून आल्यानंतर नागरीकांच्या संपर्कासाठी असलेला माझा मोबाईल नंबर 24 तास सुरू असेल.

६) मी निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागातील तरुणाई व्यसनाधीन होईल किंवा एखा‌द्या वाईट मार्गाला जाईल असे कुठलेही कृत्य माझ्याकडून होणार नाही व अशा मार्गाला गेलेले तरुण पुन्हा चांगल्या मार्गावर येतील ह्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन.

७) मी निवडून आल्यानंतर मी ज्या पक्षातून निवडून आलो आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नाही. याची मी हमी देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT