NCP manifesto for Pune : पुणेकरांना मेट्रो अन् पीएमटीचा प्रवास फुकट, पाणी, ट्रॅफिक अन् प्रदुषणावर कायमचा तोडगा : अजितदादा अन् सुप्रियाताईंचा एकत्रित वादा!

NCP Pune PMC Election 2026 Manifesto : पुणे महापालिकेसाठी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यातून राष्ट्रवादीकडून भरमसाठ आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे. तर हा जाहीरनामा प्रकाशित करताना व्यासपीठावर अजित पवारांसह खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे देखील उपस्थित होते.
Supriya Sule, Ajit Pawar
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule and Amol Kolhe during the release of the NCP joint manifesto for the Pune PMC election, highlighting the free metro proposal.Sarkarnama
Published on
Updated on

NCP Pune PMC Election Manifesto : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडका लावला आहे. अशातच आता पुण्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.

या जाहीरनाम्यातून राष्ट्रवादीकडून भरमसाठ आश्वासनांची अक्षरश: खैरात करण्यात आली आहे. तर हा जाहीरनामा प्रकाशित करताना व्यासपीठावर अजित पवारांसह खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. यावेळी अजितदादांनी पुणेकरांना मोफत मेट्रो आणि PMT बसचं आश्वासन दिलं.

तसंच पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे पुणेकरांचे पेट्रोलच्या स्वरूपात दररोज कोट्यवधी रुपये वाया जातात. त्यामुळे ते पैसे मेट्रोच्या प्रवासासाठी वापरता येतील, असा मोठा प्लॅन त्यांनी यावेळी सांगितलं. तर शिवाय पीएमपीएल बस आणि मेट्रोतून मोठ्या प्रमाणात प्रवास झाला तर रस्त्यावर वाहनं कमी होतील.

Supriya Sule, Ajit Pawar
Uddhav Thackeray : 'पक्षात घेण्यासाठी यांना सलीम कुत्ता, बिल्ली, उंदीर चालतात, पण भाजपचे आमदार रडतात...', नाशिकच्या सभेतून ठाकरेंचा हल्लाबोल

त्यामुळे साहजिक पुणे प्रदुषणमुक्त होईल, हे शक्य असून मी तज्ञांशी बोलून हे सांगत असल्याचा दावा अजित पवारांनी केला. शिवाय आमच्या ताब्यात महापालिका दिली तर मी मोफत मेट्रो करून दाखवीन, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तर आम्ही पुण्यात राहतो. त्यामुळे आम्हाला पुणेकरांबद्दल जिव्हाळा आहे.

इतर बाहेरचे कोणी आले तर तेवढ्यापुरतेच येतील. त्यामुळे आम्हालाच संधी द्या, असं म्हणत त्यांनी महायुतीतील मित्र पक्षांना टोला लगावला. दरम्यान, यावेळी अजित पवारांनी पाणी पुरवठ्यासंबंधीची आश्वासने देखील मोठ्या प्रमाणात दिली. सर्व प्रभागांतील नळांमधून दररोज उच्च दाबाने पाणीपुरवठा केला जाईल आणि लोकांना भेडसावणारी टँकरची समस्या कायमची संपवली जाईल.

Supriya Sule, Ajit Pawar
Raj Thackeray : 'महाजनांपेक्षा लाकूडतोड्या बरा, हे झाडांआधी कार्यकर्ते छाटतात अन् बाहेरून मागवलेली झाडे...'; तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंनी भाजपला घेरलं

तसंच पीएमसीच्या सर्व 41 प्रभागांमधील पाणीपुरवठ्याच्या निश्चित वेळा काही महिने आधीच जाहीर केल्या जातील, असं आश्वासन राष्ट्रवादीने दिलं आहे. तर यावेळी त्यांनी 1 एप्रिल 2026 पासून सर्व मध्यमवर्गीयांच्या मालकीची 500 चौरस फुटांपर्यंतची घरे पूर्णपणे मालमत्ता करमुक्त केली जातील.

शिवाय विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅब्लेट देण्याचं आणि पुणे महापालिकेच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्याचं, स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची उभारणी करण्याचं आश्वासनही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणेकरांना भरसमसाठ आश्वासनं दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com