Kolhapur Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापूर, हातकणंगले शिंदे गटाकडे? आघाडीच्या उमेदवारीवर ठरणार युतीचा पैलवान

Kolhapur and Hatkanangale Loksabha Constituencies : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना दोन्ही मतदारसंघात महायुतीचा उमेदवाराबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन बैठका होत आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपाबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची बैठक पार पडल्यानंतरच राज्यातील निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला राज्यातील 23 जागांवर भाजपने निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केल्यानंतर काही प्रश्नांची उकल स्पष्ट झाली आहे.

या निरीक्षकांच्या यादीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा समावेश नसल्याने या दोन्ही जागा शिंदे गटाकडे (Shinde) राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र या दोन्हीही विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळणार का? याचे उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवारावर अवलंबून असल्याचे सांगितले जाते. (Kolhapur Political News)

भाजपचे (BJP) यंदाचे मिशन आबकी बार 400 पार असल्याने भाजप आपल्या सह मित्र पक्षांच्याही जागे बाबत चाचपणी करत आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघापैकी एका जागेवर भाजपने दावा केल्यानंतर शिवसेनेच्या दोन्हीही विद्यमान खासदारांमध्ये कमालीची अस्वस्थता होती.

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन शिवसेनेच्या फुटी नंतर दिलेल्या शब्दांची आठवण करून उमेदवारीचा शब्द घेऊन आल्याचे सांगत प्रचाराला सुरुवात केली आहे.

तर दुसरीकडे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी आपल्या उमेदवाराची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या खांद्यावर ठेवून प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र महायुती आघाडीत या दोन्ही जागांवर शिंदे गटाचाच उमेदवार असणार का याबाबत अजून कोणीही स्पष्ट आणि ठोस दुजोरा दिलेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुतीच्या गोटात अद्यापही या दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघात कोण असणार? यावरच महायुतीचा उमेदवाराचे गणित अवलंबून आहे.

महाविकास आघाडीकडून छत्रपती घराण्यातील माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) किंवा शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati ) असतील तर महायुतीमध्ये वेगळ्या उमेदवाराचा विचार केला जाऊ शकतो. त्या ठिकाणी भाजपच्या शोमिका महाडिक किंवा समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांना मैदानात उतरू शकतात.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटात कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही जागा काँग्रेसकडे गेल्यास त्या ठिकाणी छत्रपती घराण्यातील उमेदवार असू शकतो. तर महायुतीत देखील उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार यावरच महायुतीच्या उमेदवाराचं भवितव्य ठरणार आहे.

तर दुसरीकडे हातकणंगले (Hatkanangale) लोकसभा मतदारसंघातील निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या विरोधात होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी कोणत्याही आघाडीत येण्यास नकार दिल्याने त्या ठिकाणी राष्ट्रवादी (NCP) आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. त्या ठिकाणी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT