Mahavikas Aghadi Kolhapur Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची महाविकास आघाडीची बुधवारी दुसऱ्या दिवशीही बैठक पार पडली. ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिवसेना ठाकरे गट, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसह इतर मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आली.
तर गुरुवारी शिवसेना (उबाठा), नॅशनल काँग्रेस पार्टीचे शरद पवार त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित होण्याची शक्यता आहे.
चर्चेनंतर काही जागांवरील मार्ग मोकळा झाला असून चार जागांबाबत महाविकास आघाडीतील पक्षांची ठाम भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीतील चार मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी तिन्ही पक्षांनी जोर लावला आहे. दरम्यान उद्या होणाऱ्या बैठकीत जागांबाबत अंतिम चर्चा होणार असल्याचे समजते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाने दावा केल्यानंतर त्याची अंतिम चर्चा करण्यासाठी मुंबईतील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. आजच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 48 पैकी जवळपास 40 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीत नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती आहे.
मात्र काही जागांवरील तिढा कायम असल्याचे सांगितले जाते. यामध्ये कोल्हापूर, बुलढाणा, जालना आणि मुंबई दक्षिण या जागेवर निर्णय अद्याप न झाल्याची माहिती आहे. गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत या जागेवर मार्ग निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत ठाकरे गटही ठाम आहे. शिवाय या मतदारसंघावर काँग्रेसकडून ही जोर लावण्यात येत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातून मिळणारी कोल्हापूर ही जागा ठाकरे गटाकडे असावी, असे ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांचे मत आहे. अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे(Uddhav Thackeray ) गटानेही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी ताकद लावल्याने या जागेवरील पेच कायम आहे. उद्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा होऊन या संदर्भातील मसुदा जाहीर करण्यात येणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.